Video: भयंकर! कारमधून उतरली अन् अटल सेतुवरून मारली उडी; ड्रायव्हर अन् पोलिसांमुळे वाचला जीव
Atal Setu : मुंबईतील अटल सेतू पुलावरून उडी मारून एका महिलेने तिचा जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या कॅब ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव बचला आहे. (Atal Setu) या महिलेने उडी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हाच ड्राव्हरने तीला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचवेळी पोलिसांचं पथकही तेथे पोहोचलं आणि त्यांनी रेलिंगवर चढून त्या महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
मुंबईतील अटल सेतूवरून उडी मारून जीव देण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात घ़डल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच दादरमधील एका डॉक्टरने तसंच त्यानंतर एका बिझनेसमननेदेखील अटल सेतूवरून उडी मारून आयुष्य संपवलं होतं. तशीच एक घटना मुंबईत शुक्रवारी पुन्हा घडली. याच थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला 56 वर्षांची आहे. या महिलेने कॅब बूक केली आणि अटल सेतूवर पोहोचल्यावर ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. त्यानंतर उतरून ती रेलिंगच्या पलीकडे जाऊन उभी राहिली. मात्र, हा प्रकार बघताच कॅबचालही उतरला आणि प्रसंगावधान राखत त्याने महिलेला धरून ठेवलं. अटल सेतूवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असल्याने, कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांना ती महिला दिसली आणि त्यांनी तातडीने पेट्रोलिंग टीमला सूचना दिली. त्यामुळे पोलिसही वेळेत पोहचले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीत कुणाचं पारडं जड? ठाकरे गटा हव्यात सगळ्या जागा?
गाडीतून उतरून 4 ते 5 पोलिसांनी धाव घेत त्या महिलेला कसेबसे वर खेचून तिचे प्राण वाचवले. महिलेला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यासाठी ते अधिकारी स्वत: रेलिंगवर चढले होते आणि त्यांनी स्वत:चा जीवही धोक्यात टाकला होता. मात्र त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या महिलेला वाचवलं. त्यांच्या या शौर्याचे कौतुक केले जात आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले.
अटल सेतूवरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेला गाडी ट्रायव्हर आणि पोलिसांनी वाचवलं आहे.#AtalSetu #ViralVideos #MumbaiPolice pic.twitter.com/fCLEWxbiXE
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 17, 2024