व्हॅन चालक ठरला ‘हिरो’, गाडी चालवताना आला हृदयविकाराचा झटका तरीही वाचवले 20 मुलांचे प्राण

व्हॅन चालक ठरला ‘हिरो’, गाडी चालवताना आला हृदयविकाराचा झटका तरीही वाचवले 20 मुलांचे प्राण

Tamil Nadu School Van Driver : तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) बुधवार 24 जुलै रोजी अशी एक घटना घडली ज्याची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM MK Stalin) यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे. तमिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात एका स्कूल व्हॅन चालकाने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्यापूर्वी त्याने 20 मुलांचे प्राण वाचवले. त्यानंतर चालकाला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. सेमलयप्पन असे या स्कूल व्हॅन चालकाचे नाव होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी सेमलयप्पन (Semlayappan) हे वेल्लाकोइल (Vellacoil) येथील एएनव्ही मॅट्रिक्युलेशन स्कूलमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांनी स्कूल व्हॅन सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला थांबवली. या व्हॅनमध्ये 20 विद्यार्थी होते. चालकाच्या तत्परतेमुळे व्हॅनमधील सर्व विद्यार्थी सुरक्षित राहिले. यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या पत्नी देखील या व्हॅनमध्ये उपस्थित होते.

या घटनेनंतर सोशल मीडियावर सेमलायप्पन यांचा शाळकरी मुलांसोबत ड्रायव्हर सीटवर बेशुद्ध बसलेला एक फोटो व्हायरल होत आहे. सेमलायप्पन यांच्या या कार्याला सोशल मीडियावर सलाम करण्यात येत आहे. तसेच या घटनेची दाखल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी देखील घेतली आहे. त्यांनी X वर सेमलायप्पनयांची प्रशंसा केली.

त्यांनी X वर लिहिले की, त्यांच्या जीवाला धोका असतानाही त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे मौल्यवान जीव वाचवले. त्यांच्या कर्तव्याची भावना आणि आत्मत्यागासाठी आम्ही त्यांना सलाम करतो. असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. याच बरोबर मुख्यंमत्री स्टॅलिन यांनी सेमलयप्पनच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.  द्रमुक मंत्री समीनाथन यांनी हा धनादेश सेमलयप्पन यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केले आहे.

सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य संधी? एका क्लीकवर जाणून घ्या तज्ज्ञाचं मतं

तर शुक्रवारी (26 जुलै) रोजी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सेमलयप्पन यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश यांनीही कुटुंबाची भेट घेऊन श्रद्धांजली वाहिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube