Sagar Barve : जमत नसलेलं लग्न अन् उसळलेल्या दंगली… शरद पवारांना धमकी देण्याची कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Sagar Barve : जमत नसलेलं लग्न अन् उसळलेल्या दंगली… शरद पवारांना धमकी देण्याची कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. त्यामध्ये नर्मदाबाई पटवर्धन या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवणाऱ्या सागर बर्वे नावाच्या एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. ( Accused Sagar Barve Expose Reason Behind Ncp Leader Sharad Pawar Death Threat )

Shivsena Advertisement : ‘जाहिरातीमध्ये फडणवीसांचा फोटो नसला तरी आम्ही लोकांच्या मनात’

त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक देखील केली आहे. त्याने त्याने पवारांना सोशल मिडीयाच्या मध्यामातून राजकारण महाराष्ट्राचे आणि नर्मदाबाई पटवर्धन या फेक फेसबुक अकाऊंटवरून ही धमकी दिली होती. तसेच हा इंजिनीअर असल्याची माहितीदेखील सुरुवातीला समोर आली होती. या फेसबूकपेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोळकर करु’ अशी धमकी त्याने शरद पवारांना दिली होती. पोलिसांनी याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र सागर हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Neha Malik: ‘कपड्यात मजा नाही, आता नेहाने केली नवी आयडिया, नेटकरी गेले कोमात!

त्यानंतर आता या प्रकरणात पोलीस तपासादरम्यान एक चक्रावून सोडणारी माहिती समोर आली आहे. पवारांना धमकी देणारा हा सागर बर्वे हा अविवाहित असून त्याचे लग्न जमत नव्हते. या समस्येला वैतागून त्याने राज्यात सुरू असलेल्या औरंगजेब पोस्टर वादामध्ये उडी घेतली. त्यात त्याने थेट शरद पवारंना जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र यामागे आपला कोणताही राजकीय अथवा गुन्हेगारीचा उद्देश नव्हता अशी माहिती सागरने दिली आहे.

अभिनेते किरण मानेंनीही सागरला फटकारले

दरम्यान सागर बर्वेने सुपर व्हिलन अभिनेते किरण माने यांना देखील ट्रोल केले होते. त्यामुळे शरद पवार धमकी प्रकरणात त्याला अटक झाल्यानंतर माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत सागरचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. किरण माने पोस्टमध्ये म्हणाले, ‘मलाही तू अतिशय घाण, अश्लील शब्दांत ट्रोल केलं होतंस. एक वर्षाच्या आत सापडलास ! तुझं खरं नांव उघड झालेलं पाहून फारसं आश्चर्य नाही वाटलं. ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेक अकाऊंटमागे कुणीतरी भेकड माणूस असणार याची खात्री होती. पण माझा तुझ्यावर अजिबात राग नाही दोस्ता. उलट दया येते तुझी. तुला लहान भाऊ मानून तुझी समजूत काढावी वाटते’.

गेले कितीतरी महिने, फेक अकाऊंटमागे लपून तू खूप लोकांच्या आईवडिलांचा अत्यंत बिभत्स, किळसवाण्या शब्दांत उद्धार केलास बर्वे. तुझ्यावर संस्कार करणार्‍या तुझ्या आईवडिलांना मी दोष देणार नाही. तुझ्या बहिणीही सुस्वभावी असणार. काय चूक यांची? पण आज तू तुरूंगात गेल्यामुळं शरमेनं मान खाली घालावी लागली की नाही बिचार्‍यांना? आजकालच्या ‘फॅशन’नुसार काहीजण तुझ्या जातीवर जातील.

जातीचा काय संबंध रे? भारतात प्रत्येक जातीत भेदाभेद टाळून मानवतेचा संदेश देणारे महामानव जन्मलेत. चूक असलीच तर तुझ्या सडलेल्या, नासलेल्या मेंदूंची आहे बर्वे. मेंदूचा उकिरडा झाल्यानंतर असल्या किळसवाण्या शब्दांची किड पैदा होते. आईवडिलांनी आशेनं तुझं नांव ‘सागर’ ठेवलंय, तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज निघालास की रे.

अजूनही जागा हो माझ्या मित्रा. वेळ गेलेली नाही. सोड हे फडतूस उद्योग. माणूसकीशी प्रतारणा करू नकोस. आपण सगळी माणसंच आहोत. मतभेद असतात. असावेत. भांडूया. वाद घालूया. पण आपल्या मताशी न पटणारं कुणी बोललं की लग्ग्गेच आयाबहीणींची, त्यांच्या शरीरांची वर्णनं करून अत्यंत घृणास्पद शब्दांत लक्तरं काढायची??? याला मी तरी घाबरत नाही हे नीट लक्षात ठेव. आम्ही लढवय्यांचं रक्त अंगात सळसळणारी माणसं आहोत.

सहज आठवलं म्हणून सांगतो.. ‘बिगबाॅस सिझन चार’ हा एकाच टास्कमुळं शिखरावर पोचला होता. त्याच टास्कमुळं कायम ओळखला जाईल. सगळ्या टास्कचा बाप – सी साॅ टास्क ! माझा विरोधी ग्रुप, हिंस्त्र जनावरांसारखा झुंडीनं माझ्यावर – माझ्या चारीत्र्यावर चिखलफेक, कचराफेक करत होता. पाण्याचा माराही होता. एक प्रकारचं भिषण ट्रोलींगच सुरू होतं. तब्बल तीन तास मी जागचा हललो नव्हतो. नंतरच्या एका तासात बाकीचं अख्खं घर बाद झालं होतं. संपूर्ण सिझन त्या एका भन्नाट-जबराट टास्कनं गाजवला होता. सांगायचा मुद्दा हा की माझा कुठलाही हितशत्रू, काहीही करून माझं ‘सत्व’ हलवू शकत नाही.

मला माहीतीये, सोशल मिडीयावर आपल्या विचारांशी फारकत असलेल्या कुठल्याही पोस्टवर कुत्सीतपणे, अर्वाच्य, अश्लील शब्दांत कमेन्ट करून ट्रोल करणारे फक्त आठदहा लोक असतात. त्यांची शेकडो फेक अकाऊंटस् असतात. सेलिब्रिटींना बोलताना तर यांची भाषा आणखी नीच पातळी गाठते. कारण सेलिब्रिटी “कशाला उगाच वाद” म्हणून घाबरून पोस्ट डिलीट करतात. पण यांना घाबरायचं कारण नाही. यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला ‘रूतबा’ कमी होत नाही.

आपल्यावर ते गरळ ओकतात कारण आपल्याला, आपल्या शब्दांना, विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात. त्यामुळं उलट असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं… शत्रूवर नजर रोखायची…आणि गालातल्या गालात हसायचं.. ‘पठाण’ मधल्या शाहरूखसारखं. क्यों की हमारी ताकत हमारे ज़ोर से नहीं, दुश्मन के शोर से पता चलती है ! असं माने त्यांच्या या पोस्टमध्ये म्हटले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, एका ट्विटर अकाऊंटवरून शरद पवरांना तुमचाही दाभोलकर होणार, असे म्हणत धमकी देण्यात आली. यावर अनेकांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ देखील केली. त्याचे फॉलोअर्स जे आहे ते देखील वाईट पद्धतीच्या कमेंट यावर करत आहे, असे त्या म्हणाल्या. जर काही झालं तर त्याला फक्त देशाचं व राज्याचं गृहखातं जबाबदार असेल असे सुळे म्हणाल्या. काही बरं वाईट झालं तर केंद्रीय गृहखातं जबाबदार असेल, असे म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना इशारा दिला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube