अभिनेत्री रविना टंडन कुटुंबियांसह साईबाबांचरणी नतमस्तक
 
          अहमदनगर : प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन या मंगळवारी शिर्डीला आपल्या परिवारासह येऊन त्यांनी श्री साई समाधी मंदिरात दर्शन घेतले. दुपारची मध्यान आरतीही त्यांनी केली. यावेळी साई संस्थांनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना टंडन म्हणाल्या, साईबाबा काही न मागता देतात. मलाही त्यांनी भरभरून दिलं आहे. मला व माझ्या कुटुंबाला साईबाबांच्या चमत्काराची अनुभूती अनेक वेळा आली आहे. बाबा अनेकदा कोणत्याही मार्गाने धावून येतात हे आपण व मम्मी, पाप्पांनी ही अनुभवले आहे. आज आपण जो श्वास घेतो ,जे चैतन्य आहे. तोही बाबांचाच एक चमत्कार आहे.असं सांगत आपण बाबांकडे आज काही मागितले नाही. मात्र,
बाबांनी जे आत्तापर्यंत दिले त्यासाठीच बाबांचे उपकार म्हणून दर्शनाला आले आहे .असे मत प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन यांनी व्यक्त केले आहे.
 साईबाबांच्या दर्शनाने व आरतीने आपण प्रसन्न झालो आहोत.आपण लहानपणापासूनच शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येतो. बाबांनी जे काही दिले त्यासाठीच त्यांचे उपकार फेडण्यासाठी आपण दर्शनाला येत असतो. कारण साईबाबाच कोणत्याही संकटात ते दूर करण्याची ताकद देत असतात. म्हणून त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी आपण शिर्डीला दर्शनाला येत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
दरम्यान, आपले आगामी दोन-तीन पिक्चर येणार असून आपलं करिअरही साईबाबांच्या आशीर्वादावरच अवलंबून आहे. माझी मुलगी शाळेत असून ती बारावीला असल्यामुळे आली नाही. मात्र, तिला यश मिळो, अशी साईचरणी प्रार्थना केली. त्याचप्रमाणे आपल्या स्वर्गीय वडिलांना बाबा शेजारीच आश्रय मिळू दे, असेही आपण बाबांना बोललो, असल्याचं रविना टंडन यांनी सांगितलंय.


 
                            





 
		


 
                         
                        