आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंजवर चॅलेंज…

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंजवर चॅलेंज…

जालना : मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना अनेकदा चॅलेंज दिलं मात्र, ते माझं कोणतंच चॅलेंज स्वीकारायला तयार नाहीत, चॅलेंजबद्दल मला एकदा फोन करुन सांगा, असं पुन्हा एकदा आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिलंय. शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे आज जालन्यात बोलत होते.

ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री शिंदेंना आधी वरळीतून लढण्याबाबत खुलं चॅलेंज दिलं. त्यानंतर ठाण्यातून निवडणूक लढवण्याच चॅलेंज दिलं. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नसून मी छोटे चॅलेंज स्वीकारत नसल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीच्या सभेत लगावला होता.

वाचा : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

त्यावरुन आता आदित्य ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, चॅलेंजबद्दल त्यांनी मला एक फोन करुन सांगावं की आदित्य इकडून निडवणूक लढवं, मी तिथूनही निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं आव्हानच ठाकरे यांनी यावेळी दिलंय.

हे सरकार घटनाबाह्य असून अद्याप तरी विरोधकांनी माझं चॅलेंज स्वीकारलेलं नाही. विरोधकांमध्ये निवडणूक लढविण्याची हिम्मतच नसल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय. तसेच विरोधकांकडून घटनाबाह्य सरकार स्थापन करण्यात आलं असून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे पूजारी असल्याचंही ते म्हणालेत.

कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत मुख्यमंत्री छोटं चॅलेंज स्वीकारत नसल्याचं मोकळ्या खुर्च्यांना सांगत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. प्रकल्पावरुन आम्ही बोललो तर ते आणखी मोठा प्रकल्प आणणार असल्याचं सांगत आहेत. तुम्ही आधी संविधानाविरोधी काम करणं बंद करा, असंही त्यांनी सुनावलंय.

दरम्यान, यांच्या 13 खासदारांनी आणि 40 आमदारांनी राजीनामा देऊन दाखवावा, त्यांचे मुख्यमंत्री देखील हे करु शकत नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच तुम्ही राज्यपाल नवीन आणून दाखवाच ते स्वत: म्हणतात की मला इथून जायचंय, त्यांच्याजागी दुसरा राज्यपाल येत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारसह राष्ट्रपतीला जाऊन सांगावं, आम्हांला असा महाराष्ट्रद्वेशी राज्यपाल नको, असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube