कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर, धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर, धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

धुळे : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. धुळे जिल्ह्यातही अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मुद्द्यावरून विधानसभा अधिवेशनही गाजलं. अद्यापही बहुतांश भागात पंचनामे झाले नाहीत, अशी विरोधकांनी टीका केली होती. दरम्यान, आज राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी धुळे, साक्री तसेच शिंदखेडा या भागातील अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी हताश शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे.

राज्यातील बहुतांश भागात झालेल्या अवकाळा पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एकीकडे राज्यात गुढीपाडव्याचा सण साजरा होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा रब्बीच्या पिकांना बसला आहे. काढणीला आलेला गहू अक्षरशः भुईसपाट झाल होता. यापूर्वी अतिवृष्टीने राज्यातील खरिप पिकांचं नुकसान केलं तर आता अवकाळी पावसाने रब्बीच्या पीकांचंही मोठं नुकसान केल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.

Ajit Navale : दूध उत्पादकांची लूट थांबणार, किसान सभेच्या मागणीला यश 

दरम्यान, या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण व्हावेत. तसेच त्यांच्यापर्यंत मदत पोहोचावी यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर आलो, असून येत्या 25 तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर मदत घोषित केली जाईल, असे आश्वासन यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश यावेळी सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे मात्र वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा देखील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. विद्युत डीपी वेळेवर बसवली जात नसल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे काही शेतकऱ्याने केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या पुढे मांडल्या. वीज वितरण महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना डीपी संदर्भात वेळोवेळी तक्रारी करून ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी सत्तार यांनी अश्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देऊन राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असं सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube