अहमदनगर झेडपीचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांचे निधन

अहमदनगर झेडपीचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांचे निधन

अहमदनगर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव भांगरे (वय ६०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

दरम्यान भांगरे यांना डायबेटिज तसेच अन्य काही किरकोळ आजार होते. त्यावर उपचार देखील चालु होते. मात्र, गुरुवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अचानक रात्री त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्‍वास सोडला.

त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, दोन विवाहित मुली, मुलगा जिल्हा बँकेचे संचालक अमित, बंधू दिलीप असा मोठा परिवार आहे. भांगरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होतील, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले.

भांगरे यांची कारकीर्द
भांगरे कृषी पदवीधर होते. तब्बल 5 विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. संयमी व सर्वांशी सलोख्याने वागणे हा त्यांचा स्वभाव होता. अकोले पंचायत समितीचे सभापती, समाजकल्याण समितीचे सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube