Ajit Pawar Passes Away : फक्त 45 सेकंदांचा काळ अन् होत्याचं नव्हतं झालं…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवारांना घेऊन निघालेल्या विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी बारामतीकडे टेकऑफ केले होते.

  • Written By: Published:
Ajit Pawar Passes Away : फक्त 45 सेकंदांचा काळ अन् होत्याचं नव्हतं झालं...

Ajit Pawar Baramati Plane Carsh Update : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आज (दि.28) बारामतीत भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर एक तासाने सकाळी ९ वाजता ही घटना घडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच्या सभांना संबोधित करण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. विमान लँडिंगसाठी अवघ्या 45 सेकंदांचा अवधि राहिलेला असताना हा भीषण अपघात झाला अन् होत्याचं नव्हतं झालं…

नेमकं काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवारांना घेऊन निघालेल्या विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी बारामतीकडे टेकऑफ केले होते. तर, बारामतीमध्ये 8 वाजून 50 मिनिटांनी विमानाचे लँडिंग होणार होते. मात्र, विमान 40 मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचलं होतं. यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी अनर्थ घडला.

Ajit Pawar Life Journey : अजित पवार कधीही सत्तेबाहेर न गेलेले मराठा नेते….

45 सेकंद आधी विमान रडारवरून गायब झालं

पायलटने सुरक्षित लँडींग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं. यानंतर हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं. लँडिंसाठी अवघा 45 सेकंदांचा अवधी राहिलेला असताना विमान अचानक रडारवरून गायब झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातापूर्वी दोन्ही वैमानिकांनी खराब दृश्यमानतेचा उल्लेख केला होता असेही समोर येतयं. त्यामुळे लँडिंगसाठी अवघ्या 45 सेकंदाचा वेळ राहिलेला असताना होत्याचं नव्हतं झालं अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात, विमान जळून खाक, फोटो समोर

खाजगी VSR कंपनीचे विमान 

अजित पवारांना मुंबईहून बारामतीकडे घेऊन निघालेले विमान हे खासगी VSR कंपनीचे असल्याचे सांगितले जात असून, विमानात अजितदादा, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता.

follow us