NCP MLA : दिवाळीनंतर राज्यात राजकीय भूकंप? राष्ट्रवादीचे सर्व आमदार CM फडणवीसांना भेटणार

NCP MLA : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा दिवाळीनंतर राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
NCP MLA

NCP MLA : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा दिवाळीनंतर राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. पक्षातील काही जेष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट खासदार पार्थ पवार यांच्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलवल्यानंतर सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटीला जाणार असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे बुधवारी (4 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह खासदार पार्थ पवार (Parth Pawar) , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफसह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली याबाबत सध्या पक्षाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

पार्थ पवारांनी झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) आणि प्रवक्तेपदी उमेश पाटील (Umesh Patil) यांची नियुक्ती कोणाली विचारात न घेता केल्याने अनेक नेते त्यांच्यावर नाराज असून या बैठकीत याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील सहा महिने दोघेही काम करतील आणि यानंतर त्यांच्या कामाचे मूल्यमापन करु मग पुढील निर्णय घेऊ अशी भूमिका या बैठकीत पार्थ पवार यांनी घेतली असल्याची चर्चा आहे.

सिंह राशीसह ‘या’ पाच राशींच्या संपत्तीत आज होणार वाढ ; जाणून घ्या सर्वकाही-

दिवाळीनंतर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

अजित पवार यांच्या मृत्यूसंबंधी एक बैठक देखील देवगिरी निवासस्थानी पार पडली असल्याचीही माहिती समोर आली आहे. अजित पवार मृत्यूसंबंधी सीआयडी चौकशी अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर मांडावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

follow us