संयोगिताराजे करत असलेले आरोप खोटे!; परशुराम सेवा संघाचा खुलासा

संयोगिताराजे करत असलेले आरोप खोटे!; परशुराम सेवा संघाचा खुलासा

पुणे : नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील (Kalaram temple) पुजाऱ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजे (Sanyogita Raje यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा आहे, असं म्हणतं जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, आता परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी संयोगिताराजे करत असलेले आरोप खोटे असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

देशपांडे यांनी सांगितले की, आम्हाला छत्रपती घराणे म्हणून संयोगिता राजे यांचा आदरच आहे पण, आपण जे काही पसरवत आहात ते साफ खोट आहे. एक- दोन महिन्यापूर्वी त्या काळाराम मंदिरात गेल्या होत्या आणि पोस्ट आत्ता येते आहे, जेव्हा हिंदू विरुद्ध मुस्लिम वातावरण राज्यात तयार झाले आहे. याला ब्राह्मण विरूध्द ब्राह्मणेतर करण्याचा डाव तर नसावा ? अशी देखील शंका येते असल्याचं देशपांडे यांनी सांगिलतं. शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नाी संयोगिताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आलं होतं. काळाराम मंदिरात ही घटना घडल्याची माहिती स्वत: संयोगिता राजेंनी सोशल मीडियावर दिली होती. त्यांनी केलेले आरोप खोडून काढताना देशपांडे बोलत होते.

शिर्डीच्या साईमंदिरात 3 दिवसांत 4 कोटींची देणगी जमा 

देशपांडे म्हणाले की, महंतांनी तुम्हाला अडवले होते तर 11000 दक्षिणा का देऊन आलात. शिवाय, संयोगिता राजे यांना वेदातले कोणते मंत्र नक्की म्हणायचे होते याबाबत काहीही खुलासा दिलेला नाही. महत्वाचं म्हणजे, रामाच्या मंदिरात महामृत्युंजय जप करतात कि शिवाच्या? असा सवाल त्यांनी केला. आणि तरीही त्यांनी तो जप केला.

दरम्यान, देशपांडे यांनी सांगितलं की, तुम्ही स्वतः कोणतेही मंत्र पाठ करून या आणि कुठेही म्हणा, तुम्हाला कुणीही अडवणार नाही. पण अभिषेकात तुम्हाला नक्की कोणत्या वेदातील मंत्र अपेक्षित होते, त्याचा आधी खुलासा करा. छत्रपती घराण्याच्या आदरामुळे आणि वातावरण अजून बिघडू नये, म्हणून आम्ही आक्रमक भूमिका घेत नाही आहोत. पण शेवटी संयमाला मर्यादा असतात, असा सुचक इशारा त्यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube