…म्हणून आम्ही कोपर्डीच्या आरोपीला मारलं; मनोज जरांगेंबाबत जुन्या सहकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

Manoj Jarange यांच्याबाबत अमोल खुणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मनोज जरांगेंच्या आंदोलनातलं सगळं मला माहिती आहे.

Manoj Jarange

Amol khune Big revelation about Manoj Jarange also demand for Narco test : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत अमोल खुणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मनोज जरांगेंच्या आंदोलनातलं सगळं मला माहिती आहे. योग्य वेळी सर्व काही बाहेर काढणार आहे. तसेच तुम्ही जर कोपर्डीच्या प्रकरणातल्या आरोपीला मारलं नाही तर मी फाशी घेईन, असं मनोज जरांगे पाटील आम्हाला बोलले होते.

कोण आहे अमोल खुणे?

अमोल खुणे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे जुने सहकारी आहेत. तसेच ते मनोज जरांगे यांच्या घात प्रकरणातील आरोपी असून नुकतीच त्यांची जामीनावर सुटका झालेली आहे. खुणे यांनी घेतली जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यांनी मनोज जरांगे आणि माझी एस आय टी आणि नार्कोटेस्ट करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

ठरलं! मुंबईचा कारभारी लवकरच होणार जाहीर, ‘या’ तारखेला नावाची होणार घोषणा

ते म्हणाले की, माझी मागणी एवढीच आहे की जे माझ्यावर आरोप लागले, मनोज जरांगे हे जे बोलत आहे, त्यामुळे माझं इतकंच म्हणणं आहे की आमच्या दोघांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी. शिवाय जेवढ्या चौकशी असेल तेवढ्याही कराव्यात. ईडी,सीबीआय,नार्को टेस्ट या सगळ्या चौकशा माझ्या आणि मनोज जरांगे यांच्या लावण्यात याव्या,माझ्यावर जर काही गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे.

भाजपला विचारल्याशिवाय…राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका

नाही जर गुन्हा सिद्ध झाला तर याचे परिणाम त्यांना(मनोज जरंगे)भोगावे लागतील असा इशारा देखील अमोल खुणे यांनी दिलाय. माझ्यावर त्यांनी सुपारी दिल्याचा आरोप केला होता त्यामुळे मी प्रत्येक चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे दादा गरुडनी ज्या रेकॉर्डिंग दिल्या त्या सगळ्या व्हायरल करा, त्यांच्याच(जरांगे यांच्या) पुराव्याविषयी दादा गरुड मला बोलत होता असा देखील मोठा खुलासा अमोल खुणे यांनी केला.धनंजय मुंडे आणि माझा कुठेही सीडीआर मध्ये संबंध आला नाही, त्यामुळे माझ्यावर जी आरोप लावलेले आहेत ते एस आय टी आणि नार्कोटेस्ट च्या माध्यमातून सिद्ध होतीलच,

कोर्टाने काय निरीक्षण नोंदवले?

यामध्ये काहीच आढळलं नाही, धनंजय मुंडे साहेबांना दादा गरुड हा तिथून कॉल करतो हा ठरवून कार्यक्रम केलेला आहे, विनाकारण मला तीन महिने आत मध्ये टाकलं, हे सगळं एसआयटी आणि नार्कोटेस्ट मध्येच कळेल की माझ्यावर का आरोप केले, माझी मागणी एवढेच आहे की एसआयटी नार्को टेस्ट सीबीआय या सगळ्या चौकशा त्यांची आणि माझी व्हायला पाहिजेकुणी कुणाकडून काय गबाळ घेतलं ते सुद्धा यामधून समोर येईल.

मोठी घडामोड! पिंपरी-चिंचवड पालिकेत नवा ट्विस्ट; उपमहापौरपदी शिंदे नाही तर, बाबर नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळामधल्या काही लोकांनी गबाळ(पैसे)घेतले असेल असा संशय देखील अमोल खुणे यांनी व्यक्त केलामनोज जरांगे यांचं काहीतरी झाकण्यासाठी हे सगळं केलं, मला काहीतरी माहित झालं त्यामुळे मला गुतवलंत्यांना वाटलं याला आपलं काहीतरी माहीत झालं असेल म्हणून मला गुतवलं असं देखील अमोल खुणे यांनी म्हटलं, मनोज जरांगे यांच्या आंदोलनातलं मला सगळं काही माहिती आहे त्यामुळे मी योग्य वेळेला सगळं काही बरोबर काढणार आहे,असा मोठा गौफ्यस्फोट अमोल खुणे यांनी केलाकोर्टाने सुद्धा म्हटला आहे की या केस मध्ये काहीही नाही त्याचबरोबर आज पोलीस अधीक्षकांनी सुद्धा सांगितलं की ही टेबल जामीन आहे परंतु आमचे वकील सुद्धा मॅनेज केले आणि आम्हाला तीन महिने सुटू दिले नाही.

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडचा कारभारी ठरला, रवि लांडगेंच्या नावार शिक्कामोर्तब

तुम्हीच ओळखून घ्या आता कोणी मॅनेज केले असावे असं म्हणत अप्रत्यक्ष मनोज जरांगे यांच्यावर अमोल खुणे याने निशाणा साधलाकेस सुटल्यानंतर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे,कोपर्डी प्रकरणात मी शिक्षा भोगलेली आहे मनोज जरांगे यांनी नाही भोगली, त्यांनी त्यावेळी कोर्टात असं सांगितलं होतं की याला मारा तुम्ही जर कोपर्डी प्रकरणातल्या आरोपीला मारलं नाही तर मी फाशी घेईन असं आम्हाला जरांगे पाटील बोलले होते. म्हणून आम्ही त्या आरोपीला मारलं असा देखील गंभीर आरोप अमोल खुणे यांनी केलात्यांच्या सगळ्या शिष्टमंडळावर मी आब्रु नुकसानीचा दावा टाकणार आहे.

follow us