कोण जास्त मुलींना जाळ्यात ओढणार? पैशांवरून बिनसलं अन् उझैरने अयानचा ‘पापाचा घडा’ फोडला

Paratwada Crime अयान अहमद आणि उझैर खान या दोन नराधमांनी जास्तीत जास्त मुलींना जाळ्यात ओढण्याची जणू शर्यतच लावली होती.

  • Written By: Published:
कोण जास्त मुलींना जाळ्यात ओढणार? पैशांवरून बिनसलं अन् उझैरने अयानचा 'पापाचा घडा' फोडला

Amravati Crime Update : अमरावतीतील परतवाडा परिसरात अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे जे भयानक वास्तव समोर आले आहे, त्यामागे केवळ वासना नव्हती, तर दोन नराधमांची ‘विकृत स्पर्धा’ होती. अयान अहमद आणि उझैर खान या दोन नराधमांनी जास्तीत जास्त मुलींना जाळ्यात ओढण्याची जणू शर्यतच लावली होती. पण, म्हणतात ना ‘पापाचा घडा भरला की तो फुटतोच’, तसंच काहीसं या प्रकरणात घडलं आणि या दोघांमध्ये पैशांवरून बिनसलं अन् उझैरने अयानचा ‘पापाचा घडा’ फोडला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…

नाशिक TCS प्रकरण – धार्मिक सक्ती, मानसिक छळ आणि ‘पत्नीला पाठवण्याच्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ

नेमकं प्रकरण काय आहे?

हे केवळ लैंगिक शोषणाचे प्रकरण नसून एका नियोजित गुन्हेगारी सिंडिकेटचा भाग आहे. अचलपूर येथील महाविद्यालयात शिकणारा अयान अहमद हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने आणि उझैर खानने मिळून अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्यापैकी कोण जास्त मुलींना ‘पटवू’ शकतो, याची पैज या दोघांमध्ये लागली होती. या विकृत शर्यतीतून त्यांनी १८ पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ आणि ३९ आक्षेपार्ह फोटो काढले आणि याच जोरावर मुलींना ब्लॅकमेलिंग सुरू केले. Paratwada Sexual Exploitation Case

पैशांवरून वाद आणि व्हिडिओ व्हायरल

हे प्रकरण इतके दिवस दाबले गेले कारण पीडित मुली बदनामीच्या भीतीने समोर येत नव्हत्या. मात्र, अयान आणि उझैर यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून बिनसले. उझैरने अयानकडे पैशांची मागणी केली होती, ती पूर्ण न झाल्यामुळे त्याने संतापाच्या भरात अयानचे गुपित असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर लीक केले. या एका बदल्याच्या भावनेतून या संपूर्ण ‘सेक्स रॅकेट’चा आणि ‘टॉर्चर रूम’चा पत्ता पोलिसांना लागला.

नाशिकनंतर आता पुण्यातील इन्फोसिसमध्ये लव्ह जिहादचा डाव?, मंत्री नितेश राणेंकडून दखल

नगरसेवकासमोर मागितली होती माफी

मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूरचे नगरसेवक मुजीब रशीद यांना १० दिवसांपूर्वीच याबद्दल पुसटशी कल्पना आली होती. त्यांनी अयानला गाठून जाब विचारला असता, त्याने ढोंगीपणाचा कळस करत पाय धरून माफी मागितली आणि आपली वर्तणूक सुधारण्याचे आश्वासन दिले होते. ज्या वयात त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं, त्या वयात मुलींच्या मागे लागून तो आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, असा इशारा मी त्याला दिला होता असे रशीद म्हणाले. मात्र, रशीद यांना तेव्हा कल्पना नव्हती की, हा एखादा साधा व्हिडिओ नसून अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे मोठे रॅकेट आहे.

180 महिला, 350 अश्लील व्हिडीओंचा दावा अन् तरूणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल अमरावतीतील धक्कादायक प्रकार

कठोरा नाक्यावरील त्या फ्लॅटचे रहस्य

तपासादरम्यान असे समोर आले आहे की, अयान हा अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा वापर या कृत्यांसाठी करत असे. विशेष म्हणजे, आपल्या मित्राला अवघे ५०० रुपये देऊन तो या फ्लॅटचा ताबा मिळवायचा आणि तिथे मुलींचे शोषण करून व्हिडिओ शूट करायचा. सध्या पोलिसांनी या प्रकरणी ६ आरोपींना अटक केली असून ५ मोबाईल जप्त केले आहेत. मात्र, या प्रकरणातील पीडित मुली अजूनही धास्तावलेल्या आहेत.

 

follow us