…म्हणून बायकोच्या मागे, ट्रोलिंग करणाऱ्यांना अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर

Untitled Design (55)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालंय. सध्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून फडणवीस यांनी पंजाबी भाषेत गाणं गायलं आहे. या गाण्यावरुन सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांना ट्रोलही करण्यात आलंय.

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या लोकांना अमृता फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी ट्रोलकऱ्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालंय. त्यांच्याकडं बोलण्यासाठी काही नाही, म्हणूनच ते माझ्यावर टीका करीत असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, जेव्हा नेत्यावर बंदूक ताणण्यालायक काही दिसत नाही, किंवा त्यांच्यावर बोट उचलण्यालायक काही दिसत नाही. तेव्हा खूपदा त्यांच्या बायकोच्या मागे लागतात. विरोधक तेच करीत असून त्यांनी माझ्या गाण्यालाही सोडंल नाही ते ठीक आहे.

त्यांनी माझ्या भजनालाही ट्रोल केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय पदामुळेच मला ट्रोल केलं जातंय, याबद्दल मला माहित असल्याचं त्यांनी म्हंटलयं. तसेच आता मला ट्रोलिंगची सवय झाली आहे. मी सातत्याने माझं काम करत आहे, याचा मला आनंद आहे. माझ्या गाण्याला लोकांची पसंतीही वाढत आहे, असं विधान त्यांनी केलं.

दरम्यान, स्त्री ही एक शक्ती आहे आणि स्त्री शक्तीसाठी लवकरच माझं नवीन गाणं येत आहे. ते गाणं मी म्हणणार आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे गाणं मी प्रदर्शित करणार असल्याची माहिती अमृता फडणवीसांनी दिली.

Tags

follow us