अंनिसला धक्का! बागेश्वर महाराजांना पोलिसांची क्लीनचिट
नागपूर : नागपूर पोलिसांकडून धीरेंद्र कृष्ण बागेश्वर महाराजांना(Bageshwar Maharaj) क्लीनचिट देण्यात आली आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या नागपूरातील रामकथेच्या कार्यक्रमात अंधश्रध्दा पसरवित असल्याचा आरोप अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव (shyam Manav) यांनी केला होता. त्यांनी बागेश्वर महाराजांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासानंतर बागेश्वर महाराजांना पोलिसांकडून क्लीनचीट देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
अमितेश कुमार पत्रकार परिषेदत म्हणाले, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर आम्ही बागेश्वर महाराजांच्या नागपूरातील रामकथेच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ बारकाईने तपासले आहेत. व्हिडिओंचा तपास बारकाईने सुरु असल्याने तपासाला वेळ लागत होता. अखेर तपास पुर्ण झाला असून या व्हिडिओंमध्ये अंधश्रध्दा पसरविण्याच्या उद्देशाने काहीही दिसत नसल्याचं पोलिस आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केलंय.
बागेश्वर महाराजांचे व्हिडिओ तपासले असता त्यामध्ये अंधश्रद्धा पसरविण्याविरोधात काहीही बोलले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या तक्रारीत म्हंटल्यप्रमाणे असं काही तपासात आढळून न आल्याने बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
तक्रारीत काय म्हंटलं होतं?
9 जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिलं. हे महाराज दावा करतात की, ते भक्तांचं नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात. याशिवाय धीरेंद्र महाराज कोणत्याही भक्ताच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवली हेही सांगण्याचा दावा करतात. या दाव्यातील पहिल्या भागाला टेलिपथी आणि इंट्युशन म्हणतात. तसेच घरात जाऊन काहीही पाहू शकण्याच्या क्षमतेला अंतर्ज्ञान किंवा दिव्यशक्ती (क्लेरोयान्स) म्हणतात. मी दैवीशक्तीला कोणतंही आव्हान दिलं नाही, तर महाराजांच्या दिव्यशक्तीला आव्हान दिलं आहे, असं अंनिसचे श्याम मानव यांनी म्हंटलं होतं.
नागपूरमध्ये बागेश्वर महाराजांच्या रामकथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात बागेश्वर महाराजांकडून अंधश्रध्दा पसरवण्याबाबत प्रचार केला जात असल्याचा आरोप अंनिसकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता पोलिसांनी तपास करुन कार्यक्रमात असं काही घडलंय का? याबाबत तपास केला असता असं काही आढळून न आल्याने बागेश्वर महाराजांना पोलिसांकडून क्लीनचीट मिळाली आहे.
दरम्यान, बागेश्वर महाराज आणि अंनिसमध्ये चांगलाचं वाद पेटल्याचं यावेळी दिसून आलं. अंनिसचे श्याम मानव तर बागेश्वर महाराजांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर नागपूरात काही अंशी तणावाचे वातावरण तयार झाले होते. येत्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन सतर्क झाले असल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.