जनतेचा उमेदवारीला तीव्र विरोध! भाजपच्या अर्चना पाटील यांची ‘ZP’ निवडणुकीतून माघार
कालच अर्ज भरला होता. परंतु, आज अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. (Election) लोकसभेला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढलेल्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार दाखल केला होता. परंतु, त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी दिली आहे. खासदारकीला पराभूत झाल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. परंतु आता त्यांना निवडणुकीतून माघार घेतल्याने खळबळ उडाली आहे. सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून निवडणुकीतून माघार घेतल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
धाराशिवला उजनीच पाणी आणण्याच्या योजनेचं काय झालं?, कैलास पाटलांनी इतिहासच सांगितला
अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष म्हणून तेर आणि केशेगाव गटातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, त्यांच्या उमेदवारीने पक्षात असंतोष उफाळून आला होता. त्यामुळे पक्षाकडून त्यांना माघारीचे आदेश देण्याचे आल्याचे कळते.
अर्चना पाटील यांनी जरी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी भारतीय जनता पक्षाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, असा विश्वास मल्हार पाटील यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष संघटन स्तरावर धाराशिवमध्ये मोठे काम करीत असल्याचं दिसतं. जिल्ह्यात भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून अध्यक्षही भाजपचा होईल, असंही मल्हार पाटील म्हणाले आहेत.
