धनुष्यबाण चिन्ह गोठवा सिब्बलांची मोठी मागणी! शिंदेंकडून पक्षचिन्ह जाणार? आजच्या सुनावणीत काय-काय घडलं?

Shiv Sena party and symbol जाणून घ्या शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीचे अपडेट्स!

Shivsena Party And Symbol Hearing

Arguments by lawyers of Thackeray-led Shiv Sena latest updates of hearing regarding Shiv Sena party and symbol शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून आजच्या सुनावणीमध्ये देखील ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद सुरू झाला. यावेळी सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मोठी मागणी करत युक्तीवाद संपवला. त्यानंतर ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरू झाला. त्याच दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली उद्या देखील युक्तिवादासाठी कामत यांनी 30 मिनिटे मागितले आहेत. मात्र आजच्या सुनावणीत नेमकं काय-काय घडलं जाणून घ्या सविस्तर…

फुटीर नेता स्वत: ला मुख्य नेता मानते हे 10 व्या सूचीनुसार अमान्य

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सर्वोच्च न्यायालायमध्ये सुरू असलेल्या सुनाणीमध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरू केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, विधीमंडळातील पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, असे कलम सांगतो. एकवेळ दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, पण पक्ष घेऊ शकत नाही. तसेच फुटीर नेता स्वत: ला मुख्य नेता मानते हे 10 व्या सूचीनुसार अमान्य आहे.

संविधानानुसार पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही

यावेळी सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांच्या समोर झालेल्या सुनावणीवर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, नार्वेकरांनी राजकीय पक्षामध्ये वाद असल्याचा निष्कर्ष काढायला नको होता. कारण जेव्हा आमदार अपात्रातेच्या याचिका दाखल झाल्या होत्या तेव्हा राजकीय पक्ष संघटनेत वाद नव्हता. तसेच एकनाथ शिंदेंना पक्षातून समर्थन असल्याचे किंवा राकीय पक्ष कुणाकडे आहे याचे कोणतेही पुरावे नार्वेकरांसमोर सादर झालेले नव्हते. तसेच संविधानानुसार पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही. मग नार्वेकरांनी निर्णय कशाच्या आधारावर दिला असा सवाल सिब्बल यांनी केला.

धनुष्यबाण चिन्ह गोठवा कपिल सिब्बलांची मोठी मागणी! शिंदेंकडून पक्षचिन्ह जाणार?

कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला असून शेवटी त्यांनी शिवसेना हा पक्ष ठाकरे यांचाच असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर 2018 ची पक्षघटना सादर केली होती. त्यानंतर, अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्यांनी ही वकिलांची चूक असल्याचे म्हटले. शिंदे गटाने 39 स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केली होती आणि त्या प्रत्येकाने 2018 ची पक्षघटना नमूद करून ती सादर केली होती. मग 39 वकिलांकडून चूक झाली? सिब्बल यांचा सवाल ती चूक मुद्दामहून केलेली एखादी ‘कारस्थानवजा’ कृतीही असू शकते. एकदा का घटनापीठाने निर्णय दिला असेल, तर विधानसभा अध्यक्ष त्याच्या विरोधात निर्णय कसा घेऊ शकतात? सिब्बल यांचा सवाल. एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटले म्हणजे ते राजकीय पक्ष होत नाही. शिवसेना ठाकरेंचा पक्ष, शिवसेना शिंदेंची होऊ शकत नाही’, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तसेच धनुष्यबाण चिन्ह गोठवा, अशी मोठी मागणी देखील सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

आज आम्ही शिंदेंना अपात्र करू शकतो का? – न्यायमूर्ती बागची यांचा कामत यांना सवाल

दरम्यान सिब्बलांनंतर कामत यांनी युक्तीवाद केला, ते म्हणाले की, विधिमंडळ निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही राजकीय पक्ष ठरवतात. ध्यक्ष चुकले असतील तर कोर्टानं आम्हाला दिलासा द्यावा विधीमंडळ आणि राजकीय पक्ष वेगळा – शिंदे पक्षात राहिले नाहीत तर त्यांच्याकडून होणारे दावे कसे राहतील इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे होता, जो केला गेला नाही. बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता हे खूप महत्त्वाचे आहे. असं म्हणत देवदत्त कामत यांनी कोर्टात युक्तिवादावेळी मोठे विधान केले. कामत यांच्या या युक्तीवादावर न्यायमूर्ती बागची यांनी त्यांना थेट सवाल केला की, काय आम्ही आजच्या घडीला त्यांना (एकनाथ शिंदे यांना) अपात्र घोषित करू शकतो? आम्ही स्वतः विधानसभा अध्यक्षांची भूमिका बजावून त्यांना अपात्र ठरवू शकतो का?

शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा; न्यायमूर्ती बागची याचं मोठं विधान

त्याचबरोबर यावेळी बोलताना न्यायमूर्ती बागची यांनी जरी कामत यांना सवाल केला की, काय आम्ही आजच्या घडीला त्यांना (एकनाथ शिंदे यांना) अपात्र घोषित करू शकतो? तरी त्यांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा, निर्णय घेण्यासाठीआम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो. शिंदेंकडे बहुमत होत यात काही वादच नाही पण, बहुमतावेळी शिंदे पक्षाचे सदस्य होते का? असं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रकरणात नेमका काय ट्विस्ट येणार आहे. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कामत यांच्या युक्तीवादा दरम्यान आजची सुनावणी संपली!

पुढे बोलताना कामत म्हणाले की, शिंदे ज्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, ते त्यांना ठाकरेंनी दिलं, आता ते बोलतात मीच अध्यक्ष आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी उचललेली पावलं चुकीची आहेत. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली उद्या देखील युक्तिवादासाठी कामत यांनी 30 मिनिटे मागितले आहेत.

follow us