एसआयटी अशोक खरातच्या घरात; भोंदूची पत्नी निसटली, पण मुलगा हाती लागला…

शिर्डीत दाखल गुन्ह्याप्रकरणी एसआयटी अशोक खरातच्या घरी गेल्यानंतर पत्नी कल्पना खरात फरार झाल्याचं समोर आलंय.

Untitle (8)

Ashok Kharat : बहुचर्चित नाशिकचा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात रोजच नवनवीन घडामोडी समोर येत असल्याचं दिसून येत आहे. या भोंदूबाबाची पोलिस कोठडी आज संपणार असून त्याच्याविरोधात अनेक नवीन तक्रारी दाखल होत आहेत. महिलांचं लैंगिक शोषण, अर्थिक गंडा, यांसह इतर अनेक कारनाम्यांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता पोलिस कोठडीत अशोक खरात स्पष्ट माहिती देत नसल्याने एसआयटीने पत्नी आणि मुलाच्या चौकशीसाठी घरी मोर्चा वळवला मात्र, यावेळी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.

पुणे विद्यापीठाच्या उत्तर पत्रिका खरंच पावसात भिजल्या का? विद्यार्थ्यांचा आरोप अन् प्रशासनाचे उत्तर

अशोक खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्यावर दाखल गुन्ह्याप्रकरणी त्याची आत्तापर्यंत तीन वेळा पोलिस कोठडी घेण्यात आलीयं. त्याला हजर करण्याआधीच रात्री नाट्यमय घडामोड घडली. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात खरातची पत्नी कल्पना खरातवरही गुन्हा दाखल करण्यात आलायं. एसआयटीचे पथक खरातच्या घरी गेले असता पत्नी कल्पनाने धूम ठोकलीयं. त्यामुळे घरी असलेला खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलंय.

भारत सरकारचा ‘न्याय सेतू’ आता व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध, वाचा संपूर्ण माहिती

मुलासमोरच बापाची चौकशी होणार..
मागील अनेक दिवसांपासून अशोक खरातची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान, खरात पोलिसांना सहकार्य करत नाहीये. कुठलीही स्पष्ट माहिती तो देत नसल्याने तपासात पुढे जात नाही. खरातकडून माहिती घेऊन पत्नीला अटक करण्याचं पोलिसांचं टार्गेट आहे, मात्र त्याआधीच पत्नी कल्पना फरार झाल्याने पोलिसांचा संशय वाढलायं.

दरम्यान, अशोक खरातची पोलिस कोठडी संपणार असल्याने त्याला आज पोलिस न्यायालयासमोर हजर करणार असून या सुनावणीदरम्यान, सरकारी पक्ष नेमकी काय बाजू मांडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

follow us