`ए अँड टी कन्सलटंट`ला `एईएसए`चा प्रतिष्ठेचा ज्युरी अॅवॉर्ड प्रदान
ज्युरी रेकमेंडेशन अॅवॉर्ड ए अँड टी कन्सलटंटचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट विकास अचलकर व आर्किटेक्ट मनोज तातुस्कर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
`A&T Consultants` awarded `AESA’s prestigious jury award : आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सर्व्हेअर्स असोसिएशन, पुणे ( एईएसए ) तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा कमर्शिअल कॅटॅगरीतील ज्युरी रेकमेंडेशन अॅवॉर्ड ए अँड टी कन्सलटंटचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट विकास अचलकर व आर्किटेक्ट मनोज तातुस्कर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. ग्रँड शेरेटन येथे शनिवारी (21 मार्च) हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
बाणेर – पाषाण लिंक रोडवरील माँट व्हर्ट व कॉनबिल लँडमार्क्स एलएलपी या कंपन्यांच्या माऊंट क्लॅरिया या कमर्शिअल प्रकल्पाच्या डिझाईनसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार नुकताच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे अध्यक्ष विलास अवचट यांच्या हस्ते व आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सर्व्हेअर्स असोसिएशन, पुणे चे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव राजे, व समन्वयक पराग लडके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार ए अँड टी कन्सलटंटचे आर्किटेक्ट विकास अचलकर व आर्किटेक्ट मनोज तातुस्कर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
दादा, ही वेळ कायम लक्षात राहील…, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कृतीने गणेश शिंदे भारावले
बाणेर पाषाण लिंक रोडवरील उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या वेगळ्या डिझाईनसाठी व सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या इमारतीच्या आकर्षक इलिव्हेशन डिझाईनसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराविषयी श्री. अचलकर व श्री. तातुस्कर यांनी आनंद व्यक्त केला व आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सर्व्हेअर्स असोसिएशन, पुणे धन्यवाद दिले आहेत.