Atul Bhatkhalkar : आदित्य ठाकरेंना अर्थसंकल्प समजतो का ?

Atul Bhatkhalkar : आदित्य ठाकरेंना अर्थसंकल्प समजतो का ?

कल्याण : देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) जेव्हा मांडला जातो. तेव्हा तो देशाकरता मांडला जातो. अर्थसंकल्पावर बोलण्या इतपत आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांना अर्थसंकल्प समजत नाही, अशी टिका करत भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळात मुंबई आणि एमएमआर परीघामध्ये ३१४ किलोमीटर मेट्रोचे जाळे निर्माण करायला प्रारंभ केला. केंद्र आणि राज्य सरकारमुळे हे शक्य झाले. मोदीं यांच्यामुळेच जपानच्या कंपनीने या प्रोजेक्टसाठी लोन दिले. न्हावाशेवा शिवडी पारबंदर प्रकल्प यासाठी लोन या कंपनीने दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ९ वर्षाच्या कालखंडात जितकं मुंबई आणि महाराष्ट्राला मिळालं आहे तितके कधीच इतिहासात मिळालेले नाही हे आदित्य ठाकरे यांनाही माहिती आहे. ज्या कोस्टल रोडच आदित्य हे कैतुक करत आहेत. त्याला परवानग्या केंद्र सरकारने दिल्या आहेत, हे लक्षात घ्यावे.

केंद्रीय अर्थसंकल्पा संदर्भात कल्याण येथे आलो आहे, असे सांगत भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत आयुक्तांच राज्य आहे. त्यामुळे आयुक्त जे करतील ते अंतिम सत्य असेल. त्यावर आंदोलन करण्याची भाषा कोणी करू नये. मुंबईकरांना विकास महत्वाचा आहे. पूर्ण अर्थसंकल्प मांडू न देणे हे योग्य नाही. सत्तेत असताना कधी विकासकामे केली नाहीत आता अर्थ संकल्प पूर्ण न होऊ देणे हे हास्यास्पद आहे.

कोकणातली जागा ही आम्ही खेचून घेतली जी मुळात पूर्वी शेकापकडे होती. नागपूरमध्ये पराभव झाला ही वस्तुस्थिती असून त्यावर आत्मचिंतन करू पण हा उमेदवार भाजपाचा नसून भाजपा पुरस्कृत होता. यावेळचा अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीय नाही तर समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा आहे. कोविडच्या परिस्थितीतून बाहेर येऊन रोजगार देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय अशा सर्वांना दिलासा देणारा आहे, असे अतुल भातखळकर यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube