विदर्भात एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार; विधान परिषदेसाठी बच्चू कडू घेणार मोठा निर्णय?
Bacchu Kadu : विधानपरिषद निवडणुकीवरुन राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे
Bacchu Kadu : विधानपरिषद निवडणुकीवरुन राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाने देखील मोठा डाव टाकला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या ऑफरवर आता बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बच्चू कडू यांना विधानपरिषदेची ऑफर दिली होती मात्र बच्चू कडू शिवसेनेत (Shivsena) नसल्याने या निर्णयाला काही नेत्यांनी विरोध केला असल्याची माहिती देखील समोर आली होती. यानंतर बच्चू कडू यांना प्रहार जनशक्ती (Prahar Janshakti) शिवसेनेत विलीन करण्याची ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरवर आता बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस राहिल्याने बच्चू कडू (Bacchu Kadu) काय निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
बच्चू कडू 2004 ते 2019 पर्यंत अचलपूर मतदारसंघातून प्रहार जनशक्तीचे आमदार म्हणून निवडून आले आहे मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभावचा सामना करावा लागला होता. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जर बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिवसेनेत विलीन केला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची विदर्भात ताकद वाढणार आहे.
अहिल्यानगरच्या शासकीय मेडिकल कॉलेजचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण; यंदापासून सुरू होणार कॉलेज
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 9 जागांसाठी नियमित (Legislative Council Election 2026) तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 12 मे रोजी या जागांसाठी मतदान होणार असून 12 मे रोजीच निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. भाजपकडून उद्या २९ एप्रिल रोजी उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.