खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला अपघात, एकजण गंभीर जखमी

खासदार बजरंग सोनवणे हे बीडहून केजकडे जाताना त्यांचा ताफा मस्साजोगच्या बस स्थानकावर थांबला होता.

News Photo   2026 04 28T172922.082

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sonawane) खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला दुचाकीने जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्यातला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या कारच्या काचा फुटल्या. तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे.

पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार 1 मे महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला उपस्थित राहणार

खासदार बजरंग सोनवणे हे बीडहून केजकडे जाताना त्यांचा ताफा मस्साजोगच्या बस स्थानकावर थांबला होता. त्यावेळी ही अपघाताची घटना घडली आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती.

या अपघातात बजरंग सोनवणे यांना काही झाले नाही पण त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

follow us