Vikhe Vs Thorat : बाळासाहेब एक काय ते सांगा.., मंत्री राधाकृष्ण विखेंचा टोला
अहमदनगर : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तुम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका सांगा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, काही तरी एक सांगा, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांनी ठणकावून सांगितलंय. राधाकृष्ण विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंबाबतचा विषय संपला कारण आता निवडणुकही संपली आहे. भाजपने दिलेल्या पाठिंब्यामुळेच तांबे निवडून आले. उद्याच्या काळात त्यांनी पक्षाच्या भूमिकेसोबत रहावे एवढीच आमची अपेक्षा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
तसेच काँग्रेस पक्षाची भूमिका सांगा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा. काही तरी एक सांगा तुम्ही काँग्रेस पक्षाला सोईनुसार वापरू शकत नाही. पण मुळातः बाळासाहेब थोरात व्यथित झाले की, भूमिका काय घ्यावी असा जोरदार टोलाही त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांना लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबेंच्या प्रकरणावरुन राज्यात चागंलचं राजकारण पेटलंय. अशातच निवडणुकीत विजय झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल असलेले बाळासाहेब थोरात यांनी काल आपली भूमिका स्पष्ट केलीय. मी माझी मतं पक्षश्रेष्ठींना कळवल्याचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे. तसेच पक्ष आणि माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेऊ. जे काही करायचे ते योग्य करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
त्यानंतर विखे पाटलांनी त्यांच्या भूमिकेवरुन टोला लगावला आहे. विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे नेते म्हणून जबाबदारी स्वीकारायला हवी. कारण महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्ष घटक आहे. सोईप्रमाणे पक्षाला वापरता येणार नाही.
एकतर काँग्रेसबाबत भूमिका सांगा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, असं आवाहनही विखे यांनी थोरातांना केलं आहे. तसेच यावेळी विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात मुळात व्यथित झाले की आता भूमिका काय घ्यावी.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे प्रकरणावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे.