Video : भास्कर भगरेंना सुप्रिया सुळेंनी बांधली राखी; अजित पवारांनाही बांधणार का? राजकीय वर्तुळात चर्चा

Video : भास्कर भगरेंना सुप्रिया सुळेंनी बांधली राखी; अजित पवारांनाही बांधणार का? राजकीय वर्तुळात चर्चा

Supriya Sule Rakshabandhan : आज संपूर्ण महाराष्ट्रात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात. याच रक्षाबंधन सणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली. (Rakshabandhan) काही दिसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला होता.

Raksha Bandhan : यंदा रक्षाबंधनाला नसणार भद्राचं सावट; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्य पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला. त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचं औक्षण करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली.

अजित पवारांना राखी बांधणार का?

आज दिवसभर सुप्रिया सुळे या नाशिकमध्येच असणार आहेत. रक्षाबंधन दिनाला त्या येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेतील. त्यामुळे त्या उपमुख्यमंत्री बंधू अजित पवार यांच्याबरोबर रक्षाबंधन सण साजरा करणार का? भापल्या मोठ्या भावाला त्या राखी बांधणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बहीण-भावांच्या जोडीला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश ओळखतो. सुप्रिया सुळे दरवर्षी अजित पवार यांना राखी बांधतात. त्यांच्या या रक्षाबंधनाची माध्यमांतही चर्चा सुरू आहे.

धमक्या देऊन महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला बोलावले; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

राजकीय विरोधक

अजित पवार यांनी बंड करून भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. तर खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे. सुप्रिया सुळे या आपले वडील शरद पवार यांच्या पक्षात आहेत. म्हणजेच सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या