BJP Meeting : भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीची तयारी कशी ? कोण राहणार उपस्थित ?
नाशिक : नाशिकमध्ये (nashik) आजपासून भाजपच्या (bjp ) कार्यकारणीची बैठक मध्ये पार पडत आहे. सातपूरमध्ये (satpur ) भाजपच्या कार्यकारणीची बैठक आयोजित केली जाणार आहे. आज आणि उद्या भाजपचे मोठे नेते जसे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नारायण राणे, पियुष गोयल (Piyush Goyal) यासह राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहे. तर अमित शहा आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) या दोघं बड्या नेत्यांच्या दौऱ्याचेही यामध्ये आयोजन होतं.
मात्र काही कारणास्तव हे नेते या बैठकीला हजर राहू शकणार नसल्याचे समजते आहे. असे असले तरी राज्यातील महत्त्वाचे भाजपचे नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. आज आणि उद्या या दोन दिवसात महत्त्वपूर्ण ठराव या बैठकीत केले जाणार आहेत. जवळपास १५० ठरावांना समंती दिली जाणार असल्याने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. आणि याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सुरक्षा रक्षकामार्फत या परिसराचा आढावा घेतला जात आहे. व्हीआयपी येणार असल्याने या परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.
आयकार्ड, आयडीकार्ड, ओळखपत्राशिवाय आत मध्ये प्रवेश दिला जाणार नाहीय. आणि भाजपचे जेवढे वरिष्ठ नेते आहेत. त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्थात या संपूर्ण बैठकीच्या माध्यमातून भाजपने आपल्या २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महापालिका निवडणुकीचं रणशिंग देखील या बैठकीच्या निमित्त फुकत जाणार आहे. आणि त्यामुळं या बैठकीत नेत्यांकडून नेमकं कशा पद्दतीने मार्गदर्शन होत, खास म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीच्या माध्यमातून कशा पद्दतीने रणशिंग फुंकतात, हे बघणं महत्वाच ठरणार आहे.