Who Is Ashwini Bhide : मेट्रो वूमन BMC च्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे कोण ?
Who Is Ashwini Bhide : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे
Who Is Ashwini Bhide : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अश्विनी भिडे हे पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अश्विनी भिडे यांची या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत अश्विनी भिडे?
– अश्विनी भिडे (Ashwini Bhide) 1995 च्या तुकडीतील आयएएस (IAS) अधिकारी आहे.
– अश्विनी भिडे सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहे.
– मुंबईच्या मेट्रो विस्तारात विशेषतः तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या भुयारी प्रकल्पांच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
– त्यांनी यापूर्वी बीएमसीमध्ये अतिरिक्त आयुक्त काम केले आहे.
– त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सचिव, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी रुपाली चाकणकर आज हजर राहणार?
अश्विनी भिडे या 2030 पर्यंत आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. या काळात त्या मुंबईतील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, स्वच्छता व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि एकूणच नागरी प्रशासनावर देखरेख ठेवतील. त्यांची ही नियुक्ती प्रशासकीय शिस्त अधिक कडक करण्यासाठी आणि महत्त्वाच्या नागरी उपक्रमांची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्यासाठी उचललेले एक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.