अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी रुपाली चाकणकर आज हजर राहणार?

Rupali Chakankar : सध्या संपूर्ण राज्यात अशोक खरात प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाचा एसआयटी तपास करत असून दररोज अनेक धक्कादायक

Rupali Chakankar

Rupali Chakankar : सध्या संपूर्ण राज्यात अशोक खरात प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाचा एसआयटी तपास करत असून दररोज अनेक धक्कादायक खुलासे या प्रकरणात होताना दिसत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज नाशिकमध्ये (Nashik) जबाब नोंदवण्यासाठी येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना या प्रकरणात एसआयटीकडून समन्स बजावण्यात आले आहे. भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात एसआयटीने (SIT) रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजी – माजी ट्रस्टींना समन्स बजावले असून शिवनिका संस्थानच्या (Shivnika Sansthan) कारभाराची देखील एसआयचीमार्फत चौकशी होणार आहे. सोमवारी रुपाली चाकणकर चौकशीसाठी येणार असल्याची चर्चा होती मात्र त्यांनी आजारपणाचे कारण देत चौकशी टाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आज एसाआयटीसमोर रुपाली चाकणकर हजर होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. एसआयटीने या प्रकरणात अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करुन चॅटिंग, संभाषण याबाबत माहिती गोळा करत आहेत. अशोक खरातची 1 एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपणार असल्याने आज या प्रकरणात आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लाडक्या बहिणींना धक्का, तब्बल 71 लाख महिलांना मिळणार नाही 1500 ; कारण काय?

तर दुसरीकडे अशोक खरातसह पाच जणांवर शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आल्याने अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.

follow us