Ravikant Tupkar यांची सर्व सहकाऱ्यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर; वाचा न्यायालयाचा आदेश

Ravikant Tupkar यांची सर्व सहकाऱ्यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर; वाचा न्यायालयाचा आदेश

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह इतर सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयानं (Buldhana Court) दिलासा दिला. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी- शर्थींसह जामीन मंजूर केला. तुपकरांसह २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत आहेत. आज संध्याकाळी या सर्वांची सुटका होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना (farmers) पिक विम्याची रक्कम पूर्ण मिळावी, तसेच अतिवृष्टीत शेतीचे नुकसान झालेली रक्कम मिळावी यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकरांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला हाेता. तुपकर यांनी हे आंदाेलन पाेलिसांच्या वेषात येऊन केले हाेते. यामुळे मोठा गाेंधळ उडाला हाेता. यामुळे पाेलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले हाेते.

न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती. रविकांत तुपकर यांनां न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पाेलिसांनी त्यांची रवानगी अकाेला कारागृहात केली. तेथे देखील तुपकर यांनी त्यांचे अन्न त्याग आंदोलन सुरूच ठेवले. यामुळे तुपकारांची प्रकृती ढासळली अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

आज बुलढाणा न्यायालयाने रविकांत तुपकर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचा जामीन मंजूर केला. तुपकर यांच्या पत्नी वकील शर्वरी यांनी माहिती दिली. शर्वरी तुपकर म्हणाल्या या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश साने यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली हाेती. आज न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. या आदेशामुळे रविकांत तुपकर आणि त्यांच्या समवेत असलेल्या सहका-यांची आज अकाेला कारागृहात सुटका हाेणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube