Rohit Pawar : मुंबईला कितीही मागे खेचा शेवटी मुंबई ही मुंबईच आहे; बँक रँकिंकवरून रोहित पवारांचे चिमटे

Untitled Design   2023 03 25T120911.096

मुंबई : मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र, मुंबईत अधिकृत IFSC नाही आहे. मुंबईत आयएफएससी नसतांनाही मुंबई वेगवेगळ्या वित्तीय रॅंकिंगमध्ये (Financial Ranking)  बाजी मारून आपलं स्थान वरचढ करत आहे. आताही मुंबईने जागतिक वित्तीय सेवा केंद्राच्या रॅंकिंगमध्ये 61 वे स्थान प्राप्त केले. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्र सरकारवर टीका करत मुंबईला त्वरीत आयएफएसीचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली.

तत्कालीन पीएम मनमोहन सिंग यांनी आयएफएससी घोषणा केली होती. मुंबईतील बीकेसीत आयएफएससी उभारण्याचा प्रस्ताव होता. पण, नंतर मोदी सरकारच्या काळात आयएफएससी मुंबईमध्ये न उभारता गुजरातच्या गांधीनगरमधल्या गिफ्ट सिटीत हलवण्यात आले. गांधीनगर आर्थिकदृष्ट्या महत्वाचं केंद्र व्हाव, यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. गिफ्ट सिटी हा त्याचाच भाग आहे. यावरून रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. संकुचित मनोवृत्तीतून बाहेर येत केंद्राने व्यापर राष्ट्रहिताचा विचार करायला हवा. मुंबईला कितीही मागे खेचा शेवटी मुंबई ही मुंबईच आहे, असा टोला त्यांनी केंद्र सरकारवर लगावला.

 

आ. रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिलं की, मुंबईत अधिकृत IFSC नसतांनाही मुंबईने जागतिक वित्तीय सेवा केंद्रांच्या रॅंकिंगमध्ये 61 वे स्थान पटकावले आहे. तर दुसरीकडे देशाचे अधिकृत IFMC अंतर्गत सर्व लाभ, सर्व कायद्यांतर्गत सुट देऊन ही गिफ्टी सिटी 67 व्या स्थानावर आहे. कितीही मागे खेचा शेवटी मुंबई मुंबई आहे. हेच या रॅंकिंगवरून दिसून येते.

मुंबईला IFSC चा दर्जा दिल्यास गिफ्ट सिटी मध्ये येणाऱ्या गुंतवणुकीवर परिणाम होईल या संकुचित मनोवृत्तीतून बाहेर येत केंद्राने व्यापक राष्ट्रहिताचा विचार करायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्राने मोठ्या मनाने मुंबईला त्वरीत IFSC चा दर्जा द्यावा, त्यासाठी राज्य सरकारने देखील भक्कम पाठपुरावा करायला हवा. तो दर्जा मिळाल्यास मुंबई ही पहिल्या 25 मध्ये येऊ शकते, असं रोहित पवार म्हणाले

Tags

follow us