छ. संभाजीनगर दंगल : राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी फोनवर चर्चा केली. या संदर्भात दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे.
या संदर्भात, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जाळपोळ करणार्यांवर कठोर कारवाई निर्देश दिले आहेत. आता या घटनेतील आरोपीवर राज्य सरकार काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात रामनवमी च्या दिवशी दोन गटात हाणामारी झाली. यानंतर दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही खासगी आणि पोलिसांच्या वाहनांना आग लावण्यात आली आहे. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला होता.
मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर भाजप – महाआघाडीची शक्ती पणाला…
छत्रपती संभाजीनगर येथील हाणामारीत. जमावाने वाहनांची नासधूस केली होती. या हिंसाचारात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळालेली नाही.