आसाराम बापूचा संप्रदाय संपलेला नाही..’तो’ आरोपही सिद्ध नाही..उबाठाच्या माजी खासदाराच अजब विधान

त्यांच्या अटकेविरोधात जंतरमंतरवर भक्तांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी आपण पण आसारम बापूच्या समर्थनात गेलो

आसाराम बापूचा संप्रदाय संपलेला नाही..'तो' आरोपही सिद्ध नाही..उबाठाच्या माजी खासदाराच अजब विधान

Chandrakat Khaire on Asaram Bapu : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी खासारांनी एक मोठ विधान केलं आहे. आसाराम बापूने देशात मोठे वलय तयार केलं होतं. भारतात आजही त्याचे अनेक अनुयायी आहे. ( Asaram Bapu) बलात्कार प्रकरणात तो अकट आहे. त्यानंतर त्याच्या संप्रदायाला ओहोटी लागली. तरीही त्याचे अनेक भक्त अखिल भारतीय श्री योग वेदांत सेवा समिती आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान आसाराम बापूचा संपद्राय अजून संपलेला नाही, असं अजब विधान उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

तात्पुरता जामीन

एका तरुणीवर बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला शिक्षा ठोठावली. 25 एप्रिल 2018 रोजी जोधपूर येथील न्यायालयाने त्याला आजीवन कारवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यापूर्वीपासून तो तुरुंगात होता. त्याला 11 वर्षानंतर सहा महिन्यांचा तात्पुरता जामीन मिळाला आहे. अर्थात या काळात त्याला कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही. 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यानंतर आसारामविरोधात इतर महिलेने सुद्धा बलात्काराचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता.

बीड जिल्ह्यात निलंबनाचं वादळ! सायबर शाखेचे ; रंजीत कासले निलंबित; एका महिन्यात किती कारवाया?

यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आसाराम बापूचा संप्रदाय संपलेला नाही, असं अजब विधान केलं. एकीकडे आसाराम बापूला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावलेली असताना खैरे यांनी बापू अजून दोषी सिद्ध झाले नसल्याचा अजब दावा केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बापू सध्या सहा महिन्यांच्या तात्पुरत्या जामीनावर बाहेर आला आहे.

मोठं आंदोलन

आसाराम बापूचा संप्रदाय संपलेला नाही. देशभरात त्यांचे अनुयायी आहेत. ते सर्व त्यांची पूजा अर्चा, सण त्याच जोमाने करतात, असे खैरे म्हणाले. आसाराम बापूला अटक झाली, त्यावेळी आपण दिल्लीत होतो. त्यांच्या अटकेविरोधात जंतरमंतरवर भक्तांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी आपण पण आसारम बापूच्या समर्थनार्थ गेलो होतो असंही खैरे म्हणाले आहेत.

follow us