काहींनी ओढणी ओढली तर काहींनी स्कार्फ; संभाजीनगरमध्ये तरुणीसोबत किळसवाणा प्रकार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 26T174725.703

Chhatrapati Sambhajinagar :  छत्रपती संभाजीनगर येथे एक चीड आणणारी घटना घडली आहे. एका विशिष्ट समाजाची मुलगी एका विशिष्ट समाजाच्या मुलाबरोबर फिरायला गेल्याने त्या समाजातील मुलांनी त्या मुलीची छेड भररस्त्यात छेड काढली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्व परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील बेगमपुरा परिसरामध्ये एक विशिष्ट धर्माची  तरुणी इतर धर्मीय तरुणासोबत फिरत असल्याची शंका काही तरुणांना आली त्यानंतर या तरुणी तरुणीला रस्त्यामध्ये अडवून या तरुणांनी चांगलीच झटापट घातली. असे या व्हिडिओमधून स्पष्ट होते.

फडणवीसांच्या ‘जलयुक्त शिवार’ चा देशात डंका; जलसंवर्धनात पटकावला पहिला नंबर

तरुणी या तरुणांना मला जाऊ द्या, अशी विनवणी करत आहे, मात्र तरी देखील तरुण तिच्या हातातील मोबाईल हिसकवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या संबंधी तरुणी कडून किंवा तिच्या परिवाराकडून पोलिसांमध्ये तक्रार दिली गेली नाही. पोलिसांनी तरुणीच्या घरच्यांना पोलीस ठाण्यात बोलावून देखील या तरुणीने तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

पण या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी स्वत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. व्हायरल व्हिडीओवरुन पोलिसांनी या तरुणांची ओळख पटवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेगमपुरा पोलिस करत आहेत.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, संजय राऊतांचा हल्लाबोल

दरम्यान, ज्यात एका विशिष्ट धर्माच्या मुलीला काही तरुण अडवून, तुझ्यासोबत असलेला मुलगा कोण होता अशी विचारणा करा, तिची छेड काढताना पाहायला मिळत आहेत. तसेच काही जण तिचा व्हिडीओ तयार करत होते. तिची बॅग ओढण्याचा प्रयत्न करत होते. तर काहींनी तिचा मोबाईल हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Tags

follow us