फडणवीसांच्या ‘जलयुक्त शिवार’ चा देशात डंका; जलसंवर्धनात पटकावला पहिला नंबर

फडणवीसांच्या ‘जलयुक्त शिवार’ चा देशात डंका; जलसंवर्धनात पटकावला पहिला नंबर

Water Conservation Scheme : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने (Union Ministry of Water Power) भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा (Maharashtra)देशात पहिला क्रमांक आला आहे. जलयुक्त शिवार योजनेला मोठे यश मिळाले आहे. जलसंवर्धनामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, संजय राऊतांचा हल्लाबोल

या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो.


जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2018-19 या वर्षात ही गणना करण्यात आली होती. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत.


जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणार्‍या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले असून, या कार्यात सहभागी सर्वांचे आभार सुद्धा मानले आहेत.

हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता जलयुक्त शिवार 2.0 अभियान सुद्धा असेच सर्वांनी यशस्वी करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube