Video : परभणी हिंसाचारातील आरोपी मनोरुग्ण; फडणवीसांनी विधानसभेत दिली A टू Z माहिती

  • Written By: Published:
Video : परभणी हिंसाचारातील आरोपी मनोरुग्ण; फडणवीसांनी विधानसभेत दिली A टू Z माहिती

CM Fadnavis on Parbhani violence incident : परभणी शहरात 10 डिसेंबरला संविधान अवमान घटनेनंतर आंदोलन झाले. यात तोडफोड आणि नुकसानीच्या प्रकरणात नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यात एका आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली होती. हा आरोपी कारागृहात कोठडीत होता. (Parbhani) त्याला जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी आणले होते. त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केलं आहे.

परभणीत झालेल्या तोडफोडीत तब्बल १ कोटी ८९ लाख ५४ हजारांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यंत्र्यांनी सभागृहात सांगितली. तसेच या प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवी पेक्षा जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. तसंच, कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

परभणीतील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “ही घटना घडल्यानंतर काही संघटनांनी ११ डिसेंबर रोजी बंद पुकारला होता. हा बंद शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली होती. या बैठकीला ७० ते ८० विविध संघटनांचे कार्यकर्ते हजर होते. त्यानंतर काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले होते. मात्र, त्यानंतर परभणीतील गंगाखेड रोडसह काही ठिकाणी आधी टॉवर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर अचानक ३०० ते ४०० आंदोलक जमा झाले. काही लोकांनी त्या ठिकाणी तोडफोड केली. त्या ठिकाणी जमावाने बंद असलेल्या दुकानांची देखील तोडफोड केली. काही गाड्या जाळण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पोलिसांनी जमावबंदी लागू केली. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत लाठीचार्ज केला”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube