मर्दानी 3 मध्ये बालकलाकार अवनी जोशीची भूमिका केंद्रस्थानी

बहुप्रतिक्षित "मर्दानी 3" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाची कथा मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि अपहरणाभोवती फिरते.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 01 30T141957.404

Child artist Avani Joshi’s role takes centre stage in Mardaani 3 : राणी मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित “मर्दानी 3” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाची कथा मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि अपहरणाभोवती फिरते. यशराज फिल्मस्ची निर्मिती असलेल्या अभिराज मिनावाला यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीबरोबरच मल्लिका प्रसाद आणि जानकी बोडीवाला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरनंतर खलनायिकेच्या भूमिकेतील मल्लिका प्रसाद यांच्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे.

या चित्रपटाची आणखीन एक विशेष बाब म्हणजे मराठमोळी बालकलाकार अवनी जोशी या चित्रपटामध्ये एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री राणी मुखर्जी सोबत झळकण्याची संधी तिला या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली आहे. आजवर अनेक मराठी मालिका, रिॲलिटी शो आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “जारण” या चित्रपटामध्ये आपण तिच्या अभिनयाची उत्तम झलक पाहिली होती. अवनी जोशी ही सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि गायिका रसिका जोशी यांची मुलगी आहे.

दादा…तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट

या चित्रपटाच्या भूमिकेबद्दल बोलताना अवनीने सांगितले की यशराज फिल्मच्या टीमकडून तिला ऑडिशनसाठी बोलवण्यात आले आणि या ऑडिशनमधून एक एक टप्पे पार पाडत तिने हा रोल पटकावला. चित्रपटामध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत असून राणी मुखर्जी आणि अनेक दिग्गज कलाकारांबरोबर बरोबर झळकण्याची संधी तिला या निमित्ताने मिळाली आणि सोबत काम करण्याचा उत्तम अनुभव मला मिळाला आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याचे तिने सांगितले.चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपटालादेखील तितकाच उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा असल्याचे बाल कलाकार अवनी जोशीने आवर्जून सांगितले.

follow us