माझ्या भाषणाने सुपारी बाजांना मिर्ची लागली; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता राज ठाकेंवर बोचरी टीका

माझ्या विधानसभेतील भाषणाने अनेकांना मिर्ची लागली. ती आजही लागेल असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांची राज ठाकरेंवर नाव घेता टीका

News Photo   2026 07 10T165330.550

मी मिसिंग लिंकवर विधानसभेत जे भाषण (Fadanvis) केलं त्यावरून अनेकांना मिर्ची लागली. पण जगातील अनेक अनुभवी लोकांनी त्यामध्ये काम केलं आहे. त्यावर पावसाने एकही दरड नाही. मिसिंग लिंक कुठही डॅमेज नाही. तरीही पैसे पाण्यात पैसे पाण्यात असं बोललं गेलं ही काही माझी बदमनामी नाही ती महाराष्ट्राचीच आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील त्यांच्याच भाषणार झालेल्या टीकेला उतत्र दिलं. यावेळी त्यांनी नाव न घेता प्रामुख्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.

मी टोपी फेकली ती लागली सुपारीबाजांना असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. फेकली एकसाठी आणि लागली दुसऱ्यालाच असंही ते म्हणाले. त्याचबरोबर मी माझ्या भाषणात हिंदी बोललो, भाडे के टट्टू. त्यावरून टीका झाली. आता ते वाक्य मागं घेत भाटक गदर्भ म्हणतो . जर ते कुणाला समजलं नसेल तर सुपारीबाज. मी टोपी फेकली होती. ती अनेकांना लागली. तसंच, मी हिंदी बोललो हे ज्यांना समजायला पाहिजे ती दुसऱ्यांनाच लागली. आमचे मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले हिंदी का बोलले. पण असो, ते आमचे मित्र आहेत. राजकारणात तर त्यांना आम्हाला काही धोका नाही. बर झालं ते राजकारणात आहेत. ते जर खरच चमिमिक्री क्षेत्रात असते तर एकाही स्टँडप कॉमेडिला काम भेटलं नसतं असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

मिसिंग लिंकवर बोलले तर महाराष्ट्राचा अपमान होतो का ? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

कनेक्टींग लिंक संदर्भात 7 हजार पाण्यात गेले हा माझा अपमान नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, त्या पसरवणं हा महाराष्ट्राचाच अपमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला सभागृहात प्रत्युत्तर दिलं. तसेच, मिमिक्री आर्टिस्ट म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरही पलटवार केला. मी हिंदीत बोललो, ‘भाडे ते टट्टू’ म्हटल्यावर काहींना दु:ख झालं. त्यामुळे, ⁠जाऊन मी अभ्यास केला, भाडे टे टट्टू या शब्दाला आता सुसंस्कृत भाषेत ‘भाटक गदर्भ’ म्हणतो, तरीही कोणाला समजलं नसेल तर सुपारीबाज… असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला.

मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले, हिंदीत का बोलतो?

मी काही सुपारीबाजांबद्दल बोललो होतो, मी तर टोपी फेकली होती पण अनेकांना का लागली मला समजलं नाही. मी एक वाक्य हिंदीत बोललो, ज्यांना समजायला पाहिजे त्यांच्यासाठी बोललो, पण दुसऱ्यालाच मिर्ची लागली. पण, आमचे ⁠मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले हिंदीत का बोलले? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सभागृहातून लगावला. तसेच, ते ⁠आमचे मित्र आहेत, ते मित्र असल्यामुळे राजकारणात आम्हाला त्यांच्यापासून काही धोका नाही. पण, ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं अशी खिल्ली देखील फडणवीसांनी राज ठाकरेंची उडवली.

follow us