गुलाबराव ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे पोहोचले? मुख्यमंत्र्यांनीचं केलं उघड

गुलाबराव ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे पोहोचले? मुख्यमंत्र्यांनीचं केलं उघड

जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे पोहोचले? हे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना माहित असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. ते पाचोऱ्यात बडगुजर समाजाच्या महाअधिवेशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे बडगुजर समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं, तेव्हा शिंदे गटाचे आमदार आपल्यासोबत कसे आले?, याबाबत माहिती दिली. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्यासोबत जायला खूप अडचणी आल्या. ते अक्षरश: ॲम्बुलन्समध्ये बसून पोहोचले. तसेच गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना माहित आहे ते कसे आले, याची थोडक्यात माहिती दिली.

आमदार किशोर पाटलांनी आग्रह केला अधिवेशनाला आलंच पाहिजे. आमदार गिरीश महाजन आपला खेळाडू माणूस आहे. सर्व खेळ खेळणारा माणूस आहे. परदेशात खेळाडूंना विमानाने पाठवणारा हा पहिला मंत्री, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली. तर आम्ही धाडसानं निर्णय घेत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. अल्पावधीत हे सरकार लोकप्रिय होत आहे. 30 हजार पाणीपुरवठा योजना मंजूर करणे हा देखील रेकॉर्ड असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे, एवढा विश्वास बाळगा, असं आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. बडगुजर समाज छोटा असला तरी तुमची एकजूट महत्वाची आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube