शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही; काटा मारुन पैसे जमा करणाऱ्यांना CM फडणवीसांचा इशारा
Devendra Fadnavis : राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी

Devendra Fadnavis : राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यातच लोणीमधील शेतकरी मेळाव्यात बोलताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी लवकरच निर्णय करेल अशी माहिती दिली आहे. तसेच या कार्यक्रमात बोलताना कालच मी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भात आराखडा तयार करणं सुरु केला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर दुसरीकडे या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, सहकारी कारखान्यांचे मालक कारखानदार नसून शेतकरी आहेत. या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम सरकार करेल. शेतकऱ्यांसाठी बाजूला ठेवण्यास सांगितलेला निधी हा कारखान्याच्या नफ्यातून मागितला होता. तो शेतकऱ्यांच्या एफआरपीतून नव्हे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच एफआरपीतून मागितलं नव्हते. एफआरपीते पैसे हे शेतकऱ्यांचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमात पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांचा काटा मारुन कारखाने पैसे जमा करतात, पण शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्यात दानत नाही. तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारुन पैसा जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला देण्याची दानत नाही. जे लोक आमच्यावर टीका करत आहेत त्यांना सांगतो एकदा आरशात बघून घ्या. तुम्ही असताना तुम्ही काय केलं हे एकदा आरशात बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा.
Darjeeling Landslide : मोठी बातमी, मुसळधार पावसामुळे दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला; 7 जणांचा मृत्यू
आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पाठवला आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबवणार नाही असं देखील या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.