मुख्यमंत्री शिंदे यांच्या संवदेनशीलपणाची पुन्हा प्रचिती; चिमुकलीला देणार सर्वोत्तम उपचार
मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लोकशाहीवर भाषण करुन राज्यभर प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या कार्तिक वजीर याला दृष्टीबाधा असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी कार्तिक वजीरची दखल घेतली. त्यांनी कार्तिकला त्याला सर्व वैद्यकीय सुविधा देऊ, असा शब्द दिला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांत मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा केला होता. त्यांनी कार्तिक वजीरला जेजे रुग्णालयात उपचार दिले. दरम्यान, आताही असाच प्रसंग घडला. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्या संवदेनशीलपणाची प्रचिती आली.
आज संपूर्ण राज्यभरात धुळवडीचा उत्साह सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. ते त्यांच्या निवासस्थानी आपल्या कुटूंबियांसोबत रंगांची मुक्त उधळण करत होते. रंगाची उधळण केल्यानंतर ते आपल्या निवासस्थानाकडून टेभी नाकाकडे जायला निघाले होते. तेव्हा अचानकपणे घराच्या गेटवर विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील एक दाम्पत्य आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला घेऊन पुढे आले. यावेळी संवदेशील मुख्यमंत्र्यांनी त्या दाम्पत्यांची दखल घेतली. त्यांच्याशी संवाद साधला.
तेव्हा त्या दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांना आपली कहाणी सांगितली. ते म्हणाले, आमच्या या चिमुकलीला मुडदूस हा विकार झाला आहे. त्यामुळे तिचे जसंजसं वय वाढतं, तस तसं मुलीचे हात-पाय वाकडे होत असे आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला मुलीवर उपचार करता आले नाहीत, असं हे दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांना बोलत असतांनाच मुख्यमंत्री आपल्या गाडीतून खाली उतरले. आणि त्यानंतर त्यांनी या दाम्पत्याशी सविस्तर चर्चा केली. या लहान मुलीच्या आई-बाबांना त्यांनी दिला. यावेळी फक्त मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याला केवळ धीरच दिला नाही, तर मुंबईतील सर्वोत्तम रुग्णालयात तुमच्या चिमुकलीचा सर्वोत्तम उपचार करू, करण्याचा शब्द दिला.
नामांतराबरोबरच महागाई, रोजगार हे प्रश्नही महत्त्वाचे; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
दरम्यान, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख असलेल्या मंगेश चिवटे यांना तात्काळ बोलावून घेतले. आणि संबंधित रुग्णाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश केले.