महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने कंबर कसली; सोलापूर आणि कोल्हापूरची पहिली उमेदवारी यादी जाहीर

कोल्हापूर आणि सोलापूर या दोन्ही शहरांमध्ये उमेदवार जाहीर करून काँग्रेसकडून महापालिका निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवण्यास सुरुवात.

  • Written By: Published:
Untitled Design (160)

Congress announces first list of candidates for Solapur and Kolhapur : सोलापूरमध्ये काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 10 प्रभागातील एकूण 20 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसकडून(Congress) जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह 20 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची सून सीमा यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख यांच्या कन्या सबा परवीन शेख, माजी महापौर संजय हेमगड्डी यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूर(Solapur) महापालिकेसाठी जाहीर झालेल्या या पहिल्या यादीमुळे काँग्रेसने शहरातील निवडणुकीची तयारी जोरात सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित प्रभागांसाठीची दुसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सोडण्यास मान्यता; जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री विखे पाटलांच्या सूचना

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजी छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा यादीत समावेश आहे.

कोल्हापूरसाठी जाहीर झालेल्या यादीत अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचा समावेश असून, काँग्रेसने अनुभवी नेतृत्वावर भर दिल्याचे दिसून येते. याबाबत सतेज पाटील यांनी स्पष्ट केले की, शिवसेना उबाठा पक्षासोबत ज्या जागांवर चर्चा सुरू आहे, त्या जागांचा समावेश या यादीत करण्यात आलेला नाही. जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आलं. कोल्हापूर आणि सोलापूर या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये एकाचवेळी उमेदवार जाहीर करून काँग्रेसने महापालिका निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून, आगामी काळात इतर महापालिकांतील यादीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे.

Tags

follow us