Congress Protest : काँग्रेस पक्षाच्या वतीने व शेतकरी विरोधी शासन निर्णयाची होळी करून निषेध आंदोलन
Congress Protest : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी प्रति किलो किमान 25 हमीभाव तात्काळ जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी
Congress Protest : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी प्रति किलो किमान 25 हमीभाव तात्काळ जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच महाराष्ट्र शासनाने दिनांक 02 जून 2026 रोजी जाहीर केलेला शेतकरीविरोधी व फसवा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी आज तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे शेतकरी व कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढून निषेध करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष युवक काँग्रेस प्रशांत ओगले किरण पाटील- जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत दिनांक 02 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, कांदा उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी किमान 25 प्रति किलो हमीभाव देणे अत्यावश्यक असल्याचे आंदोलकांनी सांगितले. तसेच, शासनाने जाहीर केलेला 02 जून 2026 चा निर्णय हा शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून त्यामध्ये तात्काळ सुधारणा करून शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास येत्या 8 दिवसानी वेगवेगळ्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी किरण पाटील, तालुकाध्यक्ष संतोष भोईटे, शहराध्यक्ष सुमित बोरुडे, महिला काँग्रेस अध्यक्ष सुनीता दराडे , युवक अध्यक्ष विकास काळे , सरपंच भगवान कणसे, महेश दरेकर, डॉक्टर बायकर , चेअरमन शहाजी खेडकर पाटील , शंकर कोठारी संदीप दहतोंडे , जितू पाटोळे निलेश उबाळे , विजय बारगुजे उपसरपंच राम घोडके , संतोष सोनवणे, संदीप वागस्कर, सोहेल शेख अनेक शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.