Yavat Curfew : मोठी बातमी, यवतमधील जमावबंदी शिथिल

Yavat Curfew : दौंड तालूक्यातील यवत मधील जमावबंदी शिथिल (Yavat Curfew) करण्यात आली आहे. माहितीनुसार, सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. तर रात्री 11 नंतर जमावबंदी लागू असणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
यवत येथे झालेल्या जाळपोळ प्रकरणानंतर गेल्या तीन दिवसांपासून यवतमध्ये जमावबंदी लागू होती मात्र आता जमावबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीनुसार, जमावबंदी सकाळी 6 ते 11 पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. यवतमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र आता जमावबंदी शिथिल करण्यात आल्याने पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरु होणार आहे.
व्हॉट्सअपवरील आक्षेपार्ह पोस्टवरून दौंडच्या यवतमध्ये दोन गटामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. यानंतर गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची सभा झाली होती मात्र या सभेच्या दुसऱ्याच दिवशी दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर गावातील काही तरूणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर यवतमध्ये जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा यवतमध्ये शांतता निर्माण होत असल्याने जमावबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत यवतमध्ये जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे मात्र रात्री 11 नंतर जमावबंदी लागू असणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, राज्यात पावसाचा जोर ओसरला; जाणून IMD अलर्ट