दादा भुसेंच्या वाहनाला कट मारणं भोवले, भुसेंनी पाठलाग करत अवैध गोवंश वाहतूक पकडली

Untitled Design   2023 04 14T222034.408

Dada Bhuse’s car was about to be cut: शासनाने संपूर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी (Ban on cattle slaughter) लागू केली आहे. मात्र, या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने अवैध मार्गाने गोवंश तस्करी केली जाते. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्याच्या अनेक भागात गोवंशची अवैध वाहतूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या ताफ्याला कट मारून पळ काढल्याचा प्रयत्न एका पीकअप वाहनाने केला होता. मात्र, दादा भुसे यांनी यांनी कट मारलेल्या वाहनाचा पाठलाग करत वाहनचालकाला पकडले असता, त्या वाहनातून अवैधरित्या गोवंश वाहतूक केली जात असल्याचं निष्पन्न झालं.

आज पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्याला एका भरधाव वेगाने जाणाऱ्या पिक अप वाहनाने कट मारत पळ काढण्याच प्रयत्न केला. चालकाच्या समयसुचकतेमुळं गाडीवर नियंत्रण राहिले. आणि कुठलीही दुर्घटना झाली नाही. मात्र, त्यानंतर मंत्री भुसे यांनी गाडीचा पाठलाग करायचं ठरवलं. आणि त्यांनी आपल्या चालकाला कट मारणाऱ्या पिक वाहनाचा पाठलाग करायला सांगितलं. त्यानंतर मंत्री भुसेंनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन पकडले. त्यावेळी त्यांनी चालकाला चांगलाच दम देत कानउघाडणी केली. त्यामुळं चालकाचा भीतीने चांगलाच थरकाप उडाला होता. शिवाय, इतर अधिकाऱ्यांना वाहनाची झडती घेण्यास सांगितलं असता, त्या गाडीत अवैध पध्दतीनं गोवंशची वाहतूक करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर भुसेंनी पोलिसांना बोलून ते वाहन पोलिसांच्या ताब्यात देत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्यापाऱ्यांवरील हल्ल्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ उद्या बंद !

दरम्यान, या घटनेमुळं अवैध गोवंश वाहतूक पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलिस करत आहेत. या वाहनाने थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच कट मारल्याने हा विषय अधिक चर्चेचा ठरत आहे.

Tags

follow us