व्यापाऱ्यांवरील हल्ल्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ उद्या बंद !

व्यापाऱ्यांवरील हल्ल्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ उद्या बंद !

Ahmednagar City Crime Attak On Businessman : अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर दहशत केली जात आहे. आज भरदिवसा तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कापड बाजारात दहशत निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. गाडी लावण्याच्या वादातून अहमदनगर शहरातील कापड बाजार परिसरातील शहाजी चौक येथे तीन व्यापाऱ्यांवर काही समाजकंटकांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यात एका व्यापाऱ्याला गंभीर दुखापत झाली.

दीपक नवलानी असे गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नवलानी यांच्या पोटावर मोठ्या प्रमाणात वार झाले आहेत. हल्ला करणाऱ्या गुंडांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. या प्रकरणी अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ उद्या (शनिवारी) बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय काही संघटनांनी घेतला आहे.

अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना आवरा; मनसे आक्रमक

हल्लेखोरांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. कापड बाजार येथे गाडी लावण्यावरून दीपक नवलानी या व्यापाऱ्याशी काही समाजकंटकांनी हुज्जत घातली. त्यानंतर काही समाजकंटकांनी नवलानी व इतर दोन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात नवलानी गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर सध्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार संग्राम जगताप, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम आदींनी नवलानी यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. या घटनाक्रमामुळे बाजारपेठेतील व्यापारी आक्रमक झाल्या असून काही संघटनांनी उद्या मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube