“चुका दुरुस्त करणार” बाजार समितीच्या पराभवावर दादा भुसेंनी दिलेलं स्पष्टीकरण, म्हणाले…
“कार्यकर्ता म्हणून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या आम्ही दुरुस्त करू. मी स्वतः त्या दुरुस्त करणार आहे,” अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक येथे ते आज बोलत होते.
दादा भुसे यांच्या मतदार संघातील मालेगाव बाजार समितीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “मालेगाव बाजार समितीमधील निकाल आमच्या विरोधात गेला आहे. मतदार राजाने जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. तो मी स्वतः स्वीकारला आहे. कार्यकर्ता म्हणून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या आम्ही दुरुस्त करू. मी स्वतः त्या दुरुस्त करणार आहे.” असं ते म्हणाले.
Sanjay Shirsat : वज्रमुठ सभेत अजित पवार फक्त शरीराने, त्यांच्या मनात काय ते 2-3 दिवसांत कळेल
नाशिक जिल्हातील मालेगाव बाजार समितीमध्ये दादा भुसे यांना धक्का बसला आहे. शिवसेना उपनेते हिरे यांनी दादा भुसे यांना पराभव केला आहे. मालेगाव बाजार समितीतील गेल्या पंधरा वर्षांपासून दादा भुसे यांच्या हातात असलेली सत्ता हिरे यांनी जिंकून घेतली आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्हा पातळीवर शिवसेनेला सर्वाधिक यश आले आहे, पण मालेगाव मध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला आहे. तो आम्ही मान्य केला आहे. याला आम्ही सकारात्मक पद्धतीने घेतो आहोत, आम्ही या चुका दुरुस्त करू. असं ते म्हणाले.
Sanjay Shirsat : वज्रमुठ सभेत अजित पवार फक्त शरीराने, त्यांच्या मनात काय ते 2-3 दिवसांत कळेल
सर्वसाधारण जनता भाजप-सेनेच्या पाठीशी आहे. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती येत आहेत. त्यावर आपल्याकडे काही उपाय नाही. संपूर्ण जगात हे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे जगाला हा प्रश्नाकडे पाहावं लागेल. गेल्या काही दिवसापासून राज्यात गारपीट आणि अवकळी पाऊस झाला, तिथे तीन दिवसाच्या आता पंचनामे झाले आहेत. नसतील झाले तर तुम्ही मला सांगा तिथे तात्काळ लक्ष घालता येईल, असं देखील ते यावेळी म्हणाले.