फडणवीसांनी काढली राष्ट्रवादीच्या झेंड्याची आठवण; अजितदादांनी थेट नमस्कारच केला

फडणवीसांनी काढली राष्ट्रवादीच्या झेंड्याची आठवण; अजितदादांनी थेट नमस्कारच केला

Devendra Fadanvis On Ajit Pawar :  शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. तसेच या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावल्याची आठवण फडणवीसांनी अजितदादांना करुन दिली.

धुळे येथे झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये आम्ही देखील सहभागी झाला आहोत. भाजप व शिवसेनेच्या झेंड्या बरोबर आमचा राष्ट्रवादीचा झेंडा लावा असा चिमटा मंत्री गिरीश महाजन यांना काढला होता. यानंतर शिंदेंनी  आपल्या भाषणात बोलताना भाजप व शिवसेनेची युती ही 25 वर्षांची आहे. राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला वेळ लागेल असे म्हटले होते.

“तुम्ही माझी भावकी… सरकारला माझंही तिसरं इंजिन : अजितदादांची केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणात सुधारणा

त्यानंतर आज नाशिक येथे झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात फडणवीस यांनी अजितदादांच्या या विधानाची आठवण काढली. फडणवीस म्हणाले की, अजितदादा तुम्ही मागच्या कार्यक्रमात म्हणाले की दोनच झेंडे दिसत आहे. पण आता तीन झेंडे लागलेले आहे.त हे तीनही झेंडे घेऊन आपल्याला महाराष्ट्राचा झेंडा देशात वर न्यायचा आहे, असे फडणीस म्हणताच अजितदादांनी व्यासपीठावरुन फडणवीसांना हात जोडत नमस्कार केला.

अजितदादांची प्रत्येक फाईल माझ्याकडे येणार! नाराज आमदारांना फडणवीसांचा ‘शब्द’

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकेंवरही निशाणा साधला. “चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं. लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखतं. त्यामुळे काही लोक याच्यावरही प्रश्नचिन्ह तयार करतात .मग शासन आपल्या दारी कशा करता? लोक जमा करता कशा करता? लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात. लोक स्वतः या ठिकाणी येऊन लाभ घेऊन जातात, तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय. पण आता चिंता करू नका कोणाच्याही पोटात दुखलं तर पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहे, आणि त्यांचं पचनी पडलं नाही तरी अजितदादा आहेत. त्यामुळे सगळ्यांची पोट दुखी जी आहे त्याच्यावरचा उपचार आपण करणार आहोत.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube