लोकांच्या पोटदुखीसाठी आमच्याकडे डॉ. एकनाथ शिंदे; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 15T143533.177

Devendra Fadanvis On Udhdhv Thackeray :  शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी

यावेळी फडणवीस म्हणाले की, चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं. लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखतं. त्यामुळे काही लोक याच्यावरही प्रश्नचिन्ह तयार करतात .मग शासन आपल्या दारी कशा करता? लोक जमा करता कशा करता? लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात. लोक स्वतः या ठिकाणी येऊन लाभ घेऊन जातात, तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय. पण आता चिंता करू नका कोणाच्याही पोटात दुखलं तर पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहे, आणि त्यांचं पचनी पडलं नाही तरी अजितदादा आहेत. त्यामुळे सगळ्यांची पोट दुखी जी आहे त्याच्यावरचा उपचार आपण करणार आहोत.”

अजितदादांची प्रत्येक फाईल माझ्याकडे येणार! नाराज आमदारांना फडणवीसांचा ‘शब्द’

तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांच्या पुस्तकाचा दाखला देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आम्हाला  टीका करायची नाही. पण आमच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच वाक्य ठरलं होतं. मला अर्थसंकल्पातलं फार कळत नाही, मला सहकारातलं काहीच कळत नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही, शेवटी पवार साहेबांनी त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं त्याच्यात सांगितले यांना राजकारणातलं काहीच कळत नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले की,  त्याच्यामुळे आता असं नाही आहे.  आम्हाला अर्थसंकल्पातले कळतं, आम्हाला सहकारातलं कळतं, आम्हाला शेतीतलं ही माहिती आहे, असे म्हणत त्यांनी अजितदादांना देखील योग्य संदेश दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube