अमेरिकेत मराठी संस्कृती फुलवणारे सुनील देशमुख यांचं निधन

मुंबई : महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचं अमेरिकेत निधन झालं. अमेरिकेत राहुन त्यांनी मराठी संस्कृती फुलवण्यात मोठं योगदान दिलं. सत्तरच्या दशकात अमेरिकेत जाणाऱ्या तरूणांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात. सांगलीतून मुंबईत आणि नंतर ते अमेरिकेतील फ्लोरिडा येथे गेले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी झालेली हानी आहे. 1970 च्या दरम्यान जे […]

Untitled Design (9)

Untitled Design (9)

मुंबई : महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचं अमेरिकेत निधन झालं. अमेरिकेत राहुन त्यांनी मराठी संस्कृती फुलवण्यात मोठं योगदान दिलं. सत्तरच्या दशकात अमेरिकेत जाणाऱ्या तरूणांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात. सांगलीतून मुंबईत आणि नंतर ते अमेरिकेतील फ्लोरिडा येथे गेले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी झालेली हानी आहे.

1970 च्या दरम्यान जे महाराष्ट्रीय तरुण अमेरिकेत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी कर्तृत्व गाजवले, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सुनील देशमुख. त्यांनी विशेष पुढाकार घेतला आणि मग महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार प्रदान केले जाऊ लागले. दर वर्षी दहा ते अकरा याप्रमाणे अगदी आतापर्यंत हे पुरस्कार न चुकता दिले जात आहेत.

राजेंद्र बापट यांनी आपल्या फेसबुक पास्टद्वारे ही माहिती दिली. बापट म्हणाले की, ‘महाराष्ट्र फाउंडेशनचे सुनील देशमुख यांचं मायामी येथे निधन झालं असल्याची बातमी आलेली आहे. सुनील देशमुखांचं नाव मी ऐकलं ते 1994 मधे. मी भारतात एक विद्यार्थी होतो आणि असं कळलं की देशमुखांनी दरवर्षी किमान 1 कोटी रुपयांचे पुरस्कार उत्तम सामाजिक नि साहित्यिक कार्य करणाऱ्यांना द्यायचं घोषित केलं आहे. 1 कोटी ही रक्कम 1994 मधे प्रचंड होती.’

Exit mobile version