23 देशांची ड्रग्ज यादी! भारत, चीन, पाकिस्तानवर अमेरिकेचा ठपका; ट्रम्पने थेट अहवाल दाखवला
अहवालात भारतासह (India) 23 देशांना अंमली पदार्थांच्या उत्पादन आणि तस्करीशी जोडलेले असल्याचे म्हटले आहे.

Donald Trump Allegations Illegal Drug Producing Countries : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारावरील तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी रात्री उशिरा चर्चा झाली. निमित्त होतं मोदींचा वाढदिवस. दोन्ही नेत्यांमध्ये झालेला संवाद सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकेसोबत व्यापार चर्चाही अलीकडेच दिल्लीत पार पडल्या आहेत.
ड्रग्जविषयक अहवालात भारताचं नाव
मात्र या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने (America) काँग्रेसमध्ये सादर केलेल्या एका अहवालाने नवे वादळ उठवले आहे. या अहवालात भारतासह (India) 23 देशांना अंमली पदार्थांच्या उत्पादन आणि तस्करीशी जोडलेले असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘प्रेसिडेन्शियल डिटरमिनेशन ॲक्ट‘ अंतर्गत ही यादी काँग्रेसपुढे ठेवली.
यादीत भारतासह 23 देश
या यादीत भारत, अफगाणिस्तान, बहामा, बेलिझ, बोलिव्हिया, (Illegal Drug Producing Countries) म्यानमार, चीन, कोलंबिया, कोस्टा रिका, डोमिनिकन रिपब्लिक, इक्वाडोर, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला, हैती, होंडुरास, जमैका, लाओस, मेक्सिको, निकाराग्वा, पाकिस्तान, पनामा, पेरू आणि व्हेनेझुएला या देशांचा (Donald Trump) समावेश आहे.
पाच देशांवर गंभीर कारवाई
अमेरिकेने या यादीतील पाच देशांवर विशेष गंभीर आरोप केले आहेत. अफगाणिस्तान, बोलिव्हिया, म्यानमार, कोलंबिया आणि व्हेनेझुएला हे देश अंमली पदार्थविरोधी जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या देशांनी कारवाई अधिक कठोर करण्याची गरज असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले.
चीनवर सर्वाधिक टीका
अहवालात चीनवर तीव्र टीका करण्यात आली आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा प्रिकर्सर केमिकल्स पुरवठादार असून, फेंटानिल आणि इतर रासायनिक मादक पदार्थांच्या उत्पादनाला चालना देत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या रसायनांमुळे जगभरात नव्या प्रकारच्या व्यसनांची भर पडत असून, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे.
अमेरिकेतील गंभीर परिस्थिती
अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी आणि फेंटानिलसारख्या ड्रग्जमुळे अमेरिकेत आरोग्य संकट तीव्र झालं आहे. अधिकाऱ्यांच्या मते, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूचं प्रमुख कारण सध्या ड्रग्ज व्यसन ठरत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणीबाणीचं स्वरूप या समस्येला प्राप्त झालं आहे. मोदी-ट्रम्प यांच्यातील संवाद सकारात्मक मानला जात असला तरी ड्रग्जविषयक अहवालामुळे भारतावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. तरीही, दोन्ही देशांनी तणाव दूर करून व्यापार संबंध पूर्ववत करण्यासाठी चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत.