तब्बल 29 आमदार भेटून गेलेले असताना माझंच नाव का?, खरात प्रकरणावरून केसरकर का संतापले?

ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं नाही. त्यांच्यासाठी आम्ही काही केलेलं नाही.

News Photo   2026 03 28T181016.893

मी देवभक्त आहे, मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे ते शिर्डीला येण्याच्या वाटेवर आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कुठल्या शिव मंदिरात जायचं? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणं झालं, त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं नाही. त्यांना वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्यांच्याकडून जे चुकीचं कृत्य घडलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. असं शिंदे गटाचे माजी मंत्री दिपक केसरकर म्हणाले आहेत.

तेच दुर्दैव आहे की मी मंत्री असताना देखील तेथे येत होतो. त्यावेळी माझ्या बरोबर पोलीस असातचे, पोलिसांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती, नाहीतर त्यांनी मला सांगितलं असतं किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या काही भक्तांमध्ये अनेक शिक्षक होते, ज्यांच्यासाठी मी खूप काम केलं आहे. ते नेहमी आम्हाला सांगायचे की, तुम्ही शिक्षकांसाठी जेवढं काम केलं तेवढं कुठल्याच शिक्षण मंत्र्यांनी केलं नाही. मग त्यांना जर या गोष्टीची कल्पना असती तर त्यांनी आम्हाला सावध केलं असतं असंही दिपक केसरकर म्हणाले.  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

संसारातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून जोडपं खरातकडं गेलं आणि नको ते होऊन बसलं, आणखी एक गुन्हा दाखल

खरात याच्यावर गंभीर आरोप असून, या प्रकरणी चौकशी होऊन पीडित महिलांना न्याय मिळावा आणि कडक शिक्षा व्हावी, असं त्यांनी नमूद केले. खरात याच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, अनेक लोक भेटायला येतात, त्यामुळे कोणासोबत फोटो काढले म्हणजे तो चुकीचा माणूस आहे असे होत नाही असंही केसरकर म्हणाले.

त्याचबरोबर या प्रकरणात ३९ आमदार खरातला भेटले होते, मग फक्त आपलेच नाव का टार्गेट केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या नावाचा वापर करून गैरसमज पसरवू नयेत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. मला काही झालं तर मग पाहा असंही ते म्हणाले. तसंच, आपण शिर्डीला न चुकता जातो आणि तिथे ईशान्येश्वर मंदिरात भेट देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्याच्या पुजेबद्दल आम्हाला माहिती असू शकत नाही, कारण एवढा वेळ मी त्यांच्या संपर्कात राहिलेलो नाही. मी कुठलीही पूजा केलेली नाही. मी फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा पूजा केली आहे. याच्या पलीकडे मी कुठलीही पूजा त्यांच्या वतीने केलेली नाही. निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं चुकीचं आहे. इतकी लोकं भेटून गेले, जवळजवळ ३९ आमदार भेटून गेले, मग माझंच नाव का? हा प्रश्न आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

follow us