सुप्रिया सुळेंना दिलेल्या उत्तराचं ट्विट डिलीट; चूक कळल्यावर आता महावितरण म्हणतंय….

  • Written By: Published:
सुप्रिया सुळेंना दिलेल्या उत्तराचं ट्विट डिलीट; चूक कळल्यावर आता महावितरण म्हणतंय….

काल पुण्यात पाऊस पडला त्यानंतर अनेक भागात विजेचा प्रॉब्लेम निर्माण झाला, याची अडचण सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून मांडली. त्यावर महावितरण कडून नेहमीच्या पद्धतीने ट्विट केलं होत. पण त्यावर सोशल मीडियात झालेल्या टीकेनंतर आता महावितरणला उपरती झाली आहे. त्यांनी आपलं पाहिलं ट्विट डिलीट करून नवीन उत्तर दिल आहे.

काय होत प्रकरण?

काल पुण्यात पाऊस पडला त्यानंतर अनेक भागात विजेचा प्रॉब्लेम निर्माण झाला, याची अडचण सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून मांडली. त्यांनी लिहलं होत की, “पुणे शहर व परिसरात गुरुवारी आलेल्या पावसामुळे बावधनसह अनेक ठिकाणी विजेचा खोळंबा झाला आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. याचा नागरीकांना त्रास होत आहे. महावितरणला विनंती आहे की कृपया आपण या संदर्भात तातडीने कार्यवाही करुन वीजसेवा सुरळीत करावी.”

विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार हे राहुल गांधी, खर्गेंच्या भेटीला

सुळे यांनी आपलं ट्विट महावितरणला टॅगही केलं होत, त्यामुळे त्यावर महावितरणकडून लक्ष घालण्यात आलं. नेहमीच्या पद्धतीने त्याला उत्तर दिले. जे सगळीकडून मिळतं. महावितरणने उत्तर दिल की “प्रिय ग्राहक, आम्ही तुमची समस्या लक्षात घेतली आहे आणि ती उच्च अधिकार्यांसह सामायिक केली आहे. संघ शक्य तितक्या लवकर त्याचे निराकरण करेल.” (आता हे ट्विट डिलीट केलं आहे)

संदीपान भुमरे फक्त 8 दिवसच पालकमंत्री राहणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आणि त्याला उत्तर मिळालं. पण आता मुद्दा असा आहे. एका खासदाराने ट्विट केलं त्याला ग्राहक म्हणून नेहमीच्या पद्धतीने उत्तर देणं, किती योग्य आहे. असा  प्रश्न सोशल मीडियावर विचारला गेला. त्यावर आता महावितरणकडून नवीन उत्तर दिल आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube